कोण आहेत मोदींचे प्रस्तावक आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड? काय आहे राम मंदिराशी नातं

    14-May-2024
Total Views |
 ganeshwar shastri
 
लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार, दि. १४ मे २०२४ तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजप आणि एनडीए आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदींनी आपला उमेदवारी अर्ज भरला. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, उमेदवारी अर्ज भरताना उमेदवाराला चार प्रस्तावकांची आवश्यकता असते. दरवेळी प्रमाणे उमेदवारी अर्ज भरताना मोदींच्या प्रस्तावकांची चर्चा झाली.
 
२०२१४ ची लोकसभा निवडणुक असो की २०१९ ची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येकवेळी भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांना आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना आपला प्रस्तावक बनण्याची संधी दिली आहे. यावेळी सुद्धा मोदींनी या परंपरेचे पालन केले. मोदींचे प्रस्तावक म्हणून आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड़, जनसंघाच्या काळापासून कार्यकर्ता असलेले बैजनाथ पटेल, वाराणसी भाजपचे जिल्हा महामंत्री संजय सोनकर आणि लालचंद कुशवाहा यांना संधी दिली.
 
मोदींचा उमेदवारी अर्ज भरताना सर्वाधिक चर्चा झाली ती आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड़ यांची. उमेदवारी अर्ज भरताना ते मोदींच्या शेजारी बसलेले होते. पण त्यांची ओळख फक्त मोदींचे प्रस्तावक म्हणूनच नाही. तर ते देशातील प्रसिद्घ ज्योतिष आहेत. अयोध्येतील भव्य अशा मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मुहूर्त त्यांनीच सुचवला होता. पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा शुभ मुहूर्त सुद्धा त्यांनीच सुचवल्याचे सांगण्यात येत आहे.
  
ज्योतिषाशास्त्रात प्रसिद्ध नाव असलेल्या आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड़ यांना जगद्गुरू रामानंदाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गणेश्वर शास्त्री यांचे कुटुंब काशी येथे दीर्घकाळापासून वास्तव्यास आहे. सध्या ते काशीच्या रामघाट परिसरात गंगेच्या काठावर राहतात. गणेशेश्वर शास्त्री हे ग्रह, नक्षत्र आणि चौघडींचे महान तज्ञ आहेत.