मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत! प्रवाशांची गैरसोय

    13-May-2024
Total Views |

Mumabi Local 
 
मुंबई : सोमवारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड आल्यामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, यावेळी प्रवाशांचा संताप झाला असून त्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं.
 
सोमवार, १३ मे रोजी सकाळी कल्याण ते कुर्ल्यादरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. कळवा ते ठाणे या स्थानकांदरम्यान जवळपास एक तास रेल्वेगाड्या ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचा मोठा त्रास सहन करावा लागला. काही प्रवाशांनी गाडीतून उतरत पायी किंवा अन्य पर्यायी वाहतूकीचा मार्ग निवडला. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून सिग्नल दुरुस्तीचे काम सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.