एमएसएमई मधील रोजगार निर्मितीत ६.८ पटीने वाढ

सरकारी आकडेवारीनुसार झाले स्पष्ट

    13-May-2024
Total Views |

msme
 
 
मुंबई: उद्यम रजिस्ट्रेशन पोर्टलने महत्वाची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीत म्हटल्याप्रमाणे मायक्रो, स्मॉल, मिडियम एंटरप्राईज (MSME) (लघु सूक्ष्म मध्यम उद्योग) या क्षेत्रातील रोजगार निर्मिती त मोठी वाढ झाली आहे. एमएसएमई रोजगार निर्मितीत १९ कोटींचा टप्पा पार झाल्याचे उद्यम रजिस्ट्रेशन पोर्टलने आपल्या अहवालात म्हटले आहे.
 
यापूर्वी ४.४० कोटी एमएसएमई उद्योगांनी लघू मध्यम सूक्ष्म उद्योग मंत्रालयाच्या उपक्रमाअंतर्गत उद्यम रजिस्ट्रेशन पोर्टलवर नोंदणी केली होती. नोव्हेंबर २०२२ पासून ८.८१ कोटीवरून वाढ होत रोजगार निर्मितीत दुप्पटीहून अधिक वाढ झाली आहे.
 
२०१७ मधील सीजीएसटी कायद्याअंतर्गत ४.२७ कोटी महिला, २.१५ कोटी नोकरदार यांना जीएसटीत सूट देण्यात आली आहे. हे पोर्टल २०२० मध्ये सुरू करण्यात आले होते त्या तुलनेत आज ६.८ वेळा अधिक रोजगार निर्मिती या पोर्टलमार्फत करण्यात आली आहे.
 
एमएसएमई मध्ये रोजगार निर्मिती करण्यात सरकारच्या ' इज ऑफ डुईंग बिझनेस ' चा मोठा हात असल्याचा दावा डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर मधील अहवालात करण्यात आला होता. भारतातील औद्योगिकता व उत्पादकतेला वाव देण्यासाठी एमएसएमई क्षेत्रात नोकरी व रोजगार निर्मिती करण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न केले होते.शिवाय, इमर्जन्सी क्रेडिट लिंक गॅरंटी स्कीम (ECLGS) लाँच केल्याने MSME च्या तरलतेच्या समस्या कमी झाल्या, ज्यामुळे त्यांच्या नॉन-परफॉर्मिंग ॲसेट्स (NPAs) मध्ये घट झाली.