Q4 Results: डी मार्टचा तिमाही निकाल: कंपनीच्या निव्वळ नफ्यात २२.३ टक्क्यांनी वाढ निव्वळ नफा ५६३ कोटींवर

एकूण महसूलात ४२८४० कोटींवरून वाढत ५०७८९ कोटीवर

    11-May-2024
Total Views |

D Mart
 
 
मुंबई: डी मार्टची मातृसंस्था अव्हेन्यू सुपरमार्ट कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. डी मार्टला या आर्थिक वर्षात २२.३ टक्क्यांनी अधिक निव्वळ नफा झाला आहे. मागील वर्षाच्या तिमाहीतील ४६० कोटींच्या तुलनेत नफा वाढत ५६३ कोटींवर गेला आहे.
 
कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit After Tax) मध्ये मागील वर्षाच्या तिमाहीतील तुलनेत ४.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue From Operations) मध्ये मागील वर्षाच्या १०५९४ कोटींच्या तुलनेत १२७२७ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. कंपनीच्या ईबीआयटीडीएमध्ये मागील वर्षाच्या तिमाहीतील ७७२ कोटींच्या तुलनेत या वर्षाच्या तिमाहीत ९४४ कोटींवर वाढ झाली आहे.
 
कंपनींच्या एकूण महसूलात मागील वर्षाच्या तुलनेतील ४२८४० कोटींवरून वाढत ५०७८९ कोटींवर वाढले आहे. आर्थिक वर्ष २०२४ साठी कंपनीच्या निव्वळ नफ्यात २३५६ वरून वाढ होत २३७८ कोटींवर नफा पोहोचला आहे.