"काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मागच्याच जाहीरनाम्यांची कार्बन कॉपी!"
07-Apr-2024
Total Views | 68
मुंबई : काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे त्यांच्या मागच्याच जाहीरनाम्यांची कार्बन कॉपी आहे, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. नुकताच काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात त्यांनी अनेक आश्वासनेही दिली आहेत. मात्र, आता यावर चित्रा वाघ यांनी सडकून टीका केली. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत काँग्रेसवर निशाणा साधला.
काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे त्यांच्या मागच्याच जाहीरनाम्यांची कार्बन कॉपी आहे. स्वर्गीय इंदिरा गांधींनी १९७१मध्ये ‘गरिबी हटाव’चा नारा दिला होता आणि सत्ता मिळवली होती. तोच नारा देऊन स्वर्गीय राजीवजींनी पण राज्य केलं. नंतरही त्यांचीच सरकारं येत गेली. पण, गरिबी काही हटली नाही.…
चित्रा वाघ आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या की, "काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे त्यांच्या मागच्याच जाहीरनाम्यांची कार्बन कॉपी आहे. स्वर्गीय इंदिरा गांधींनी १९७१मध्ये ‘गरिबी हटाव’चा नारा दिला होता आणि सत्ता मिळवली होती. तोच नारा देऊन स्वर्गीय राजीवजींनी पण राज्य केलं. नंतरही त्यांचीच सरकारं येत गेली. पण, गरिबी काही हटली नाही."
"अखेरीस हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदींचं सरकार सत्तेवर यावं लागलं. मोदीजींनी देशाच्या विकासाची गॅरंटी पूर्ण करत २५ कोटी जनतेला गरिबीबाहेर काढलं. मोदीजींनी जनतेला दिलेला वादा पूर्ण केल्यामुळे हबकलेली काँग्रेस आता संविधानबदलाचा कांगावा करू लागली आहे. संविधानाप्रती निष्ठा ठेवून लोकांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या भाजपकडे संविधान गुंडाळून ठेवून आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेसवाल्यांनी बोटं दाखवावीत, हा मोठाच विरोधाभास म्हणावा लागेल," असेही त्या म्हणाल्या.