"पायपूसणे होऊन किती दिवस रहावे?" शेलारांनी कवितेतून मांडली पटोलेंची व्यथा

    07-Apr-2024
Total Views |

Nana Patole 
 
मुंबई : राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणूकांची धामधूम सुरु असून सभांमधून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका टिपण्णीही सुरु आहे. यातच आता मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कवितेतून निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर ही कविता शेअर केली आहे.
 
भाजपमध्ये होतो तेव्हा मी माननीय नानाभाऊ होतो आणि काँग्रेस मध्ये परत येताच लाथांचे मार खावे? असे म्हणत शेलारांनी पटोलेंना टोला लगावला आहे. तसेच आघाडीत "पायपूसणे" होऊन किती दिवस रहावे? असा सवालही त्यांनी या कवितेत केला आहे. शेलारांची ही कविता सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या कवितेत त्यांनी नाना पटोलेंची महाविकास आघाडीतील अवस्था वर्णन केली आहे. आशिष शेलार यांची संपूर्ण कविता पुढीलप्रमाणे..
 
 
 
हे वाचलंत का? - "ज्यांच्याकडे अजेंडा आणि झेंडा दोन्ही नाही त्यांनी काँग्रेसची दुरावस्था केली!"
 
आमचे या आघाडीत "पायपूसणे" व्हावे ?
जो येतो त्याने रोज लाथा घालून जावे ?
होतो भाजपात मी माननीय नानाभाऊ
काँग्रेस मध्ये परत येताच लाथांचे मार खावे?
हे कुठले गावगुंड काँग्रेसने घेतले कडेवर ?
ज्यांनी पाठीत आमच्या खंजीराचे वार द्यावे
कुठला हा बांडगूळ अहंकारी गट उबाठा
लटकून आमच्या फांदीवर आमचेच रक्त प्यावे?
या ढोंग्यांना आम्ही निपटले असते केव्हाच
काय सांगू ? आमच्या पक्षातील आडवे येतात डावे
देवेंद्रभाऊ, नाही सांगता येत, नाही सहन ही होत
आम्ही इथे "पायपूसणे" होऊन किती दिवस रहावे?