मार्चमध्ये उत्पादनात ऐतिहासिक वाढ १६ वर्षातील सर्वाधिक वाढ झाली

एचएसबीसी परर्चसिंग मॅनेजर इंडेक्स व एस अँड पी ग्लोबलचे संकेत

    02-Apr-2024
Total Views |

Manufacturing
 
मुंबई: भारताच्या उत्पादनात (Manufacturing) प्रचंड मोठी वाढ झाल्याचे एका माहितीत पुढे आले आहे. एचएसबीसी परर्चसिंग मॅनेजर इंडेक्स (HSBC Purchasing Manager Index) यामध्ये ५९.१ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या १६ वर्षातील ही सर्वाधिक वाढ झाली आहे. २ एप्रिल रोजी ही आकडेवारी जाहीर झाली असून भारताच्या औद्योगिक उत्पादनात ही वाढ झाली आहे.
 
औद्योगिक क्षमतेत व त्याची उत्पादन यात ही नेमकी वाढ झाल्याचे या अहवालात म्हटले गेले आहे. ऑक्टोबर २०२० मधील ही सर्वाधिक वाढ ठरली आहे. फेब्रुवारी महिन्यात ही उत्पादन वाढ ५६.९ टक्क्यांवर पोहोचली आहे. गेल्या साडेतीन वर्षांत ही उत्पादन वेगात भर पडली आहे.
 
२ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या या माहितीत मार्चमध्ये झालेली वाढ साडेतीन वर्षातील सर्वाधिक वाढ असल्याचं म्हटले आहे. भारतातील देशांतर्गत उत्पादनात झालेली वाढ व निर्यातीत झालेली वाढ पाहता ही एकूण वाढ दर्शवली गेली होती.
 
अहवालाप्रमाणे आफ्रिका, आशिया युरोप, अमेरिका या देशातील निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. एस अँड पी ग्लोबलने जाहीर केलेल्या या निर्देशांकात मे २०२२ नंतर मोठी वाढ झाली आहे.
 
याविषयी बोलताना एचएसबीसी बँकेच्या अर्थतज्ञांनी म्हटले, 'भारताचा मार्च मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय इंडेक्स २००८ नंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. उत्पादन कंपन्यांनी मजबूत उत्पादन आणि नवीन ऑर्डरच्या प्रतिसादात नोकरभरतीचा विस्तार केला. मजबूत मागणी आणि क्षमतेत झालेली वाढ यामुळे मार्चमध्ये इनपुट कॉस्ट इन्फ्लेशन वाढले,” एचएसबीसीचे अर्थतज्ज्ञ इनेस लॅम म्हणाले. S&P ग्लोबल वेगवेगळ्या उपक्षेत्रातील ४०० कंपन्यांच्या खरेदी अधिकाऱ्यांच्या प्रतिसादावर आधारित निर्देशांक तयार करते. ५० च्या वरचा निर्देशांक विस्तार दर्शवतो, तर ५० च्या खाली असलेला निर्देशांकात आकुंचन दर्शवले जाते. 'असे म्हटले आहे.
 
याशिवाय गेल्या १३ वर्षात खरेदीतीतही वाढ झाली आहे. २०२३ च्या मध्यावर या खरेदीत मोठी वाढ झाली आहे. पुन्हा त्या वस्तूंची विक्री करण्यासाठी जमवलेल्या या साठ्यात यामुळे वाढ झाली होती. उत्पादनात वाढ होतानाच रोजगार निर्मितीचा वेग बेताचा राहिल्याचे अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे.
 
उत्पादन क्षमतेत वाढ होण्याबरोबरच उत्पादन विकण्याचा दबाव उत्पादन निर्मात्यांवर दबाव मर्यादित स्वरूपात असल्याचे या अहवालात म्हटले आहे परंतु हळूहळू वाढविलेल्या उत्पादनामध्ये वाढ झाल्याने वस्तूंच्या पुरवठ्यात देखील वाढ झाल्याचे यात म्हटले गेले आहे.
 
उत्पादन व वस्तूंच्या पुरवठ्यात नियमितता असल्याने महागाईवर नियंत्रण राखणे शक्य झाले असल्याचे म्हटले आहे.
मार्चमधील निकालांनी भारतीय उत्पादन क्षेत्राच्या दृष्टिकोनाबाबत संमिश्र संकेत दिले. कंपन्या त्यांच्या आशावादासाठी नियोजित मार्केटिंगवर, नवीन उत्पादनांच्या चौकशीवर आणि वाढलेल्या मागणीवर आत्मविश्वास बाळगत आहेत. एकूण भावनांची एकूण पातळी उंचावलेली असताना, भाववाढीच्या चिंतेने आत्मविश्वासावर भार पडल्याने तो महागाई दर चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला, असे निर्देशांक संकलक S&P ग्लोबलने शेवटी म्हटले आहे.
 
याखेरीज भारताच्या औद्योगिकीतेवर बोलतना नुकतेच केंद्रीय मंत्री एस जयशंकर यांनी चीनशी आर्थिक स्पर्धा करण्यासाठी भारताने औद्योगिक उत्पादन क्षेत्रात आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे असे म्हटले आहे. मोदी सरकारच्या आधीच्या सरकारांनी यात दुर्लक्ष केल्याचेही जयशंकर म्हणाले आहेत.