३ हृदय, ३ मूत्रपिंड, १ हात अन् जीभ! मौलाना 'इद्रिस'च्या घरात सापडले मानवी अवयव

    02-Apr-2024
Total Views |
 Maulavi
 
अबुजा : आफ्रिका खंडातील नायजेरिया या देशामध्ये मानवी शरीराचे कापलेले अवयव ठेवल्याप्रकरणी एका मौलानाला अटक करण्यात आली आहे. ओलुवाफेमी इद्रिस असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यासोबत सॅम्युअल कुतेलू आणि बाबातुंडे कयोडे या नावाचे दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. या तीन आरोपींकडून पोलिसांनी मानवी हात, ३ हृदय आणि किडनी, प्रत्येकी १ मणका आणि जीभ जप्त केली आहे.
 
चौकशीदरम्यान, तिघांनीही त्यांच्या कृत्यात अल्हाजी नावाचा आणखी एक मौलवी सहभागी असल्याचे उघड केले. आता पोलीस त्याचाही शोध घेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण नायजेरियाच्या ओंडो राज्यातील आहे. दि. ७ जानेवारी २०२४ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अकोको भागात छापा टाकला. या भागात मौलवीकडे मानवी शरीराचे अवयव असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
 
 
पोलिसांनी चौकशी केली असता माहिती खरी असल्याचे निष्पन्न झाले आणि छापा टाकल्यानंतर मानवी शरीराचे सर्व अवयव मौलवीकडे सापडले. या अवयवांमध्ये १ मानवी हात, ३ हृदय, ३ मूत्रपिंड, १ पाठीचा कणा आणि १ जीभ यांचा समावेश आहे. मौलवी इद्रिस शरीराच्या या अवयवांचा वापर भूतबाधा आणि अन्य धार्मिक कार्यात करणार होता, असे सांगण्यात येत आहे. मानवी शरीराचे सर्व अवयव मौलवी यांनी घरात ठेवले होते.
 
पोलिसांच्या चौकशीत मौलवीने त्याच्या आणखी एका साथीदाराचे नावही उघड केले. इद्रिसचा साथीदारही एक मौलवी आहे ज्याने हे सर्व मानवी अवयव मौलवींना पुरवले होते. फरार मौलवीने अटक केलेल्या साथीदाराला तीन कवट्याही दिल्याचे समजते. मौलवी इद्रिसच्या चौकशीच्या आधारे पोलिसांनी सॅम्युअल कुतेलू आणि बाबातुंडे कयोडे यांनाही अटक केली. हे सर्वजण इद्रिसचे सहकारी असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
नायजेरियन पोलीस या प्रकरणात मानव तस्करीची शक्यताही तपासत आहेत. मौलवीकडून जप्त करण्यात आलेले शरीराचे अवयव कोणत्या व्यक्तीचे आहेत आणि कोणत्या परिस्थितीत त्याचा मृत्यू झाला हे शोधण्याचाही पोलिस प्रयत्न करत आहेत.