सिडकोचे माजी जनसंपर्क अधिकारी डॉ. दिलीप वाटाणे यांचे निधन!

    01-Apr-2024
Total Views |
 
Dilip Vatane
 
नवी मुंबई : सिडकोचे सेवानिवृत्त जनसंपर्क अधिकारी डॉ. दिलीप वाटाणे यांचे नुकतेच हृदय विकाराने निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा आहे. डॉ दिलीप वाटाणे हे त्यांच्या कार्यतत्पर, हसतमुख आणि मिश्किल स्वभावामुळे लोकप्रिय होते.
 
सिडकोत चांगली नोकरी असतानाही त्यांना उच्च शिक्षणाची आस गप्प बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी आपली नोकरी सांभाळत प्रसार माध्यमाच्या क्षेत्रात पीएचडी पदवी प्राप्त केली होती. निवृत्तीनंतर ते छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक झाले होते. तिथेही ते विविध उपक्रमात सक्रिय सहभागी होत असत. दरम्यान, त्यांच्या अचानक जाण्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.