मुंबई : वसई तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी बुधवार, ९ जुलै रोजी विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या हाताने तयार केलेल्या विविध भेटवस्तू दिल्या.
वसई विधानसभा मतदारसंघातील विविध जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना संसदीय प्रक्रियेचे थेट प्रात्यक्षिक अनुभवता यावे, यासाठी पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने एक प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला होता. वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या पुढाकाराने इयत्ता पाचवी ते सातवीतील ५० विद्यार्थ्यांनी विधानभवन भेटीची संधी उपलब्ध झाली.
या भेटीत विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच विद्यार्थ्यांनी विधानसभेच्या चालू अधिवेशनातील प्रत्यक्ष कामकाज पाहिले. यावेळी विविध शाळांतील शिक्षक-शिक्षिका, सहकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.