तब्बल १२ वर्षांपासून अमिताभ यांचा 'हा' चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत, काय आहे कारण?

    01-Apr-2024
Total Views |

amitabh bachchcan 
 
मुंबई : कोणताही चित्रपट चालण्यासाठी तो चित्रपट कलाकारांच्या तगड्या फळीमुळे, लिखाण, दिग्दर्शन आणि महत्वाचे म्हणजे चित्रपट ठराविक वेळेत प्रदर्शित होणे. बऱ्याचदा विविध कारणांमुळे चित्रपट अडचणीत येतात; काही प्रदर्शनापुर्वी तर काही नंतर. अशाच अडचणीत हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा एक चित्रपट अडकला असून तो एक-दोन नव्हे तर तब्बल १२ वर्ष (Amitabh Bachchan) प्रदर्शनासाठी अडकला आहे.
 
दिग्दर्शक शूजीत यांचा शुबाइट हा चित्रपट १२ वर्ष अडकला आहे. अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला शुबाइट चित्रपट २०१२ मध्ये चित्रित होऊन तयार झाला आहे. मात्र, काही अतंर्गत वादामुळे हा चित्रपट अजूनही प्रदर्शनाची पायरी ओलांडू शकला नाही आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक म्हणाले की, ‘शूबाइट’ हा चित्रपट माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळचा आहे. अमिताभ यांच्यासोबतचा हा माझा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाची एक खासियत म्हणजे जे अमिताभ बच्चन त्यांच्या उत्कृष्ट संवाद फेकीसाठी ओळखले जातात त्यांचा या चित्रपटात एकही संवाद नाही आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत”, असे दिग्दर्शकांनी म्हटले आहे.
 
रॉनी स्क्रूवाला यांच्या यूटीव्ही मोशन पिक्चर्स कंपनीने शूबाइट चित्रपटाची सुरुवात केली होती. यासाठी प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक मनोज शामलन यांनी ही कथा लिहिली होती. मात्र, आधी हा चित्रपट इंग्रजीतच होईल आणि नंतर हिंदीत या वादात १२ वर्ष निघून गेली आहेत. त्यामूळे आता तरी हा चित्रपट प्रदर्शित होईल का असा प्रश्न आता चर्चिला जाऊ लागला आहे.