"तुझं वनताराचं स्वप्न हे वन्यप्राण्यांसाठी...",रितेशची अनंत अंबानीसाठी खास पोस्ट

    06-Mar-2024
Total Views | 60
गुजरातमधील जामनगर येथे ३००० एकर जागेत अनंत मुकेश अंबानी यांनी वनतारा हे प्राणी संग्रहालय आणि रेस्क्यू सेंटर उभारले आहे. इथे हत्ती, सिंह वाघ यांच्यासह अन्य वन्यप्राणी देखील आहेत.
 

vantara 
 
मुंबई : वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी अनंत मुकेश अंबानी यांनी एत महत्वाचे पाऊल उचलत गुजरातमधील जामनगरमध्ये वनतारा रेस्क्यु सेंटर (Vantara Jamnagar) उभारले आहे. अनंत हे स्वत: प्राणी प्रेमी असल्यामुळे ३००० एकर जागेत हे जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय उभे करण्यात आले आहे. एककीडे वनताराची चर्चा (Vantara Jamnagar) सुरु आहे तर दुसरीकडे अनंत अंबानी राधिका मर्चंट यांच्या भव्य प्री वेडिंग सोहळ्याची वाहवा सुरु आहे. अशात अभिनेता रितेश देशमुख याने अनंत अंबानी यांच्यासाठी एक विशेष पोस्ट लिहित वनतारा या त्यांच्या प्रोजेक्टचा खास उल्लेख करत, “तुझं वनताराचं स्वप्न हे केवळ प्रेरणादायीच नाही तर वन्यप्राण्यांसाठी असलेले समपर्ण आहे”, असे रितेशने (Ritesh Deshmukh) म्हटले आहे.
 
हे वाचलंत का? -  मुकेश अंबानी यांना सलग तिसरी धमकी. ४०० कोटींच्या खंडणीची मागणी
 
रितेशने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “प्रेमात अखंड बुडालेल्या आणि एकमेकांचे होण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलेल्या या जोडप्याच्या प्रेम आणि आनंदाने भरलेल्या क्षणाचे आम्ही साक्षीदार आहोत. राधिका, तुझं हास्य तुझ्या मनाचं प्रतिबिंब आहे. ते अशा सौंदर्याने चमकते जे बघणाऱ्याला मोहीत करते. तुझे पुढील दिवस तुझ्या तेजस्वी हास्यासारखे आनंद आणि आशिर्वादाने भरलेले राहो”.
 

ritesh post 
 
पुढे रितेश म्हणतो, “अनंत, तुझं हृदय समुद्रासारखं मोठं असून तुझं वनताराचं स्वप्न हे केवळ प्रेरणादायीच नाही तर वन्यप्राण्यांसाठी असलेले समपर्ण आहे. तू ज्याप्रमाणे तुझे कुटुंबीय, भावंडे आणि राधिकाबरोबर बोलतोस ते हृदयस्पर्शी आहे. तुमच्या या सुंदर प्रवासासाठी हार्दिक अभिनंदन. तुमचं आयुष्य आनंदाने भरलेलं असो. आणि तुमच्या नात्यात प्रेमाचा दिवा उजळून तुम्ही अनंतकाळासाठी एकत्र राहो”.
 
हे वाचलंत का? -  मुकेश अंबानी बनले जगातील सर्वात श्रीमंत भारतीय
 
अनंत यांना जामनगरबद्दल विशेष आपुलकी का?
 
जामनगरमध्ये प्री-वेडिंगचे कार्यक्रम करण्यामागचे आणखी एक कारण अनंत अंबानी यांनी सांगितले. अनंत यांच्या आजीचा जन्म जामनगरमध्ये झाला होता. त्यांचे आजोबा धीरुभाई अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी उद्योगाची सुरुवात याच जामनगरमधून केली असल्यामुळे जामनगरबद्दल त्यांना विशेष आपुलकी आहे असून जामनगरमध्येच त्यांचेही बालपण गेले असल्यामुळे या जागेशी विशेष भावनिक नाते असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
अग्रलेख
जरुर वाचा
पराभूत सैन्याचे

पराभूत सैन्याचे 'फिल्डमार्शल'; आधी हकालपट्टीची चर्चा, आता लष्कराच्या सर्वोच्च पदावर बढती

ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करत पाकिस्तानला योग्य धडा शिकवला. या दरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची पाक सरकारने हकालपट्टी केल्याची चर्चा रंगली. त्यांच्याजागी जनरल शमशाद मिर्झा यांची नवीन लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा रंगली. असीम मुनीर यांच्यावर वैयक्तिक अजेंडा राबवल्याचा आरोप असल्याने असे करण्यात आल्याची माहिती होती. मात्र आता पाक सरकारने त्यांची फिल्डमार्शल पदावर बढती देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121