‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटासाठी अंकिता लोखंडेने किती मानधन घेतलं? निर्मात्यांनी केला खुलासा

    28-Mar-2024
Total Views |
अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाच्या निर्मात्यांना त्यांच्या कठीण काळात प्रचंड मदत केली.
 

ankita lokhnde  
 
मुंबई : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) या चित्रपटाने यशस्वी भरारी घेतली आहे. रणदीप हुड्डा दिग्दर्शित या चित्रपटात स्वत: रणदीपने सावरकरांची व्यक्तिरेखा साकारली आहे. तर यमुनाबाई विनायक सावरकर यांची भूमिका अंकिता लोखंडे हिने निभवली आहे. अंकिताच्याच या चित्रपटातील मानधनावर (Swatantryveer Savarkar) चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग यांनी एक महत्वाचा खुलासा केला आहे. त्यांनी हा चित्रपट कठीण टप्प्यावर असताना अंकिताने कशी मदत केली त्याबद्दल सांगितले आहे.
 
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत संदीप म्हणाले, “जेव्हा मी भन्साळींबरोबर सीईओ म्हणून काम करीत होतो तेव्हा मी ‘राम-लीला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘मेरी कोम’, ‘गब्बर इज बॅक’ व ‘राउडी राठोड’ या चित्रपटांची सह-निर्मिती करत होतो, तेव्हापासून अंकिताशी माझी मैत्री होती; खरं तर, अंकिता आणि कंगना याच पहिल्या लोकांपैकी एक होत्या; ज्यांनी मला सांगितलं की, तू दिग्दर्शक व्हायला पाहिजेस.”
 
पुढे ते म्हणाले की, “मला अंकिता म्हणाली होती की, संदीप जेव्हाही तुम्ही चित्रपट बनवाल तेव्हा त्यात मी त्यात काम करेन. जेव्हा मी ‘सफेद’ चित्रपट बनवला तेव्हा मी तिच्याशी संपर्क साधला; पण ती चित्रपट करू शकली नाही. पण सावरकर चित्रपटाच्यावेळी कोणीही माझ्याबरोबर काम करायला इच्छुक नव्हते. कारण- तेव्हा मी खूप मीडिया ट्रायलमधून गेलो होतो. मी तिला कधीच सांगितलं नव्हतं की, माझ्याबरोबर कोणीच काम करू इच्छित नाही. अंकितानेच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात यमुनाबाईंची भूमिका साकारावी, असं मला वाटत होतं. अंकिताला ज्यावेळी मी याबद्दल सांगितलं तेव्हा तिने एक अट घातली की, मी या चित्रपटासाठी पैसे घेणार नाही. मी तुमच्याकडून कोणत्याही भूमिकेसाठी कधीही पैसे घेऊ शकत नाही”.
 
रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तुंग प्रतिसाद मिळत आहे. २२ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सकारात्मक कमाई केली आहे. शिवाय प्रेक्षकांसह मराठी कलाकारांनी देखील या चरित्रपटाला उलचून धरले आहे. दरम्यान, या चित्रपटाने प्रदर्शनापासून आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली याची आकडेवारी समोर आली आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.१० कोटी, दुसऱ्या दिवशी २.२५ कोटी, तिसऱ्या दिवशी २.७५ कोटी, चौथ्या दिवशी २.१५ कोटी आणि पाचव्या दिवशी १.०७ कोटी असे एकूण या चित्रपटाने आत्तापर्यंत १२.४१ कोटी केली आहे.