ठाकरे पवारांच्या सभेत काँग्रेसला स्थान नाहीच!

    28-Mar-2024
Total Views |

ठाकरे- पवार
 
मुंबई : उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शरद पवार Thackeray pawar यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनिती आखली आहे. एप्रिल महीन्याच्या पहील्या आठवड्यापासुन पवार-ठाकरे संयुक्त सभा घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण ठाकरे गटाच्या या रणनितीमध्येही काँग्रेसला डावललं गेल्याचं चित्र आहे.
 
काही दिवसापुर्वी मातोश्रीवर ठाकरे आणि पवारांमध्ये बैछक झाली होती. त्यानंतर उद्दव ठाकरेंनी काँग्रेससोबत अंतिम चर्चा होणे बाकी असतानाही आपले उमेदवार दिले होते. यावरुन काँग्रेसमध्ये तिव्र नाराजीचा सुर उमटला आहे. काँग्रेसचे नेते उद्दव ठाकरेंनी फेरविचार करावा असं म्हणत आहेत. तर दुसरीकडे पुन्हा एकदा उद्दव ठाकरेंनी काँग्रेसला डावलुन शरद पवारांसोबत प्रचाराची रणनिती आखली आहे.
 
उद्धव ठाकरे यांनी यापुर्वी आपले उमेदवार असलेल्या ठीकाणी सभा घेतल्या होत्या. आता महाविकास आघाडी म्हणुन संयुक्त सभा घेण्याच येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. उद्दव ठाकरे आणि शरद पवार काँग्रेसच्या नेत्यांसोबत मिळुन या सभा करतील असं ही सांगण्यात आलं आहे. परंतु ही रणनिती आखताना काँग्रेसला विश्वासात घेतला नसल्याच्याही चर्चा आहेत.
 
त्यामुळे जागावाटपावरुन आणि प्रचार सभांच्या आखणीवरुन महाविकास आघाडीत असलेला तणाव समोर येत आहे. काँग्रेस इच्छुक असलेल्या जागांवर उबाठा गटाने परस्पर उमेदवार दिले आहेत. यावर पुनर्विचार होणार नाही. आम्ही आमच्याच कोटयातील उमेदवार दिले आहेत असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. त्यावर त्यांना विचार आणि चर्चा करावी लागेल असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
 
त्यामुळे जागावाटपावरुन वाद असताना आणि तिढा सुटलेला नसताना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी प्रचाराची रणनिती बनवल्याने काँग्रेसला डावललं जातय का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ठाकरे- पवार काँग्रेसच्या नेत्यांना घेऊन संयुक्त सभा घेतील असं सांगण्यात आलं असलं तरी काँग्रेसच्या कोणात्याही नेत्याचं नाव मात्र घेण्यात आलेलं नाही.