दिल्ली दारु घोटाळ्याचे सत्य बाहेर येणार? ईडीची 'केजरीवाल' यांच्यावर मोठी कारवाई!

    06-Feb-2024
Total Views |
 kejriwal
 
नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या अबकारी धोरणातील (दारु घोटाळ्यातील) कथित घोटाळ्याबाबत अंमलबजावणी संचालनालय (ईडी)च्या पथकाने केजरीवल यांच्यावर कारवाई करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी, ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, खाजगी सचिव विभव कुमार आणि आम आदमी पार्टीशी संबंधित काही लोकांच्या ठिकाणांवर छापा टाकला. ईडीचा संशय आहे की, या लोकं मनी लाँड्रिंग करत होते.
 
ईडीने केजरीवाल यांचे खासगी सचिव विभव कुमार आणि दिल्ली जल बोर्डाचे माजी सदस्य शलभ कुमार, आपचे खासदार एनडी गुप्ता आणि इतर काही जणांच्या ठिकाणांवर तपास सुरु केला आहे. आम आदमी पक्षाने त्यांच्या नेत्यावर आणि पक्षावर लागलेले आरोप फेटाळून लावले आहेत.
 
केजरीवाल यांच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री आतिशी मार्लेना यांनी पत्रकार परिषद घेऊन ईडीच्या कारवाईचा निषेध केला. आतिशी म्हणाल्या की, "दारु घोटळ्यासंबंधीत आरोप पूर्णपणे खोटे आहेत. आम्हाला घाबरवण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी आमच्या पक्षातील नेत्यांवर ईडी अशाप्रकारे कारवाई करत आहे."
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.