काँग्रेसच्या राज्यात कट्टरपंथी मोकाट! कर्नाटकमध्ये शिवलिंगाची विटंबना

    05-Feb-2024
Total Views | 49
 mandir
 
बंगळुरु : कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील नरबैल गावात सोमवारी प्रसिद्ध सोमेश्वर मंदिरातील शिवलिंगाची विटंबना झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रविवारी पुजाऱ्याने गर्भगृहाचा दरवाजा उघडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. शिवलिंगावर काहीतरी लिहिण्यात आल्याचे पुजाऱ्याला आढळून आले.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी बळजबरीने कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. शिवलिंगावर खडूने लेखन करण्यात आले आहे. शिवलिंगावर "जेईएस २०२४, २०२६" लिहिण्यात आले आहे. यामागे हल्लेखोरांचा काय उद्देश होता. हे उद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.
 
कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेस पक्षाचे सरकार आहे. मागच्या काहीकाळापासून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या अनेक घटना कर्नाटकमध्ये घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच कर्नाटक सरकारने १०८ फुट ऊंचावरील हनुमान ध्वज हटवला होता. सरकारच्या या कृत्यामुळे अधीच कर्नाटकमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यात आता ही घटना घडली आहे. त्यामुळे तणावात भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121