नंदुरबारमध्ये आस्था एक्सप्रेस दगडफेक!

    13-Feb-2024
Total Views |

Astha Express Nandurbar
(Astha Express Nandurbar)

मुंबई :
सुरतहून अयोध्येच्या दिशेने जाणाऱ्या आस्था एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. नंदुरबार परिसरात घटना घडल्याचे स्पष्ट होत आहे. श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर अशा अनेक घटना सध्या होत असल्याने प्रवाशांमध्ये दरम्यान गोंधळ उडाला होता. मात्र असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. सदर घटनेसंदर्भात तपास सुरु असून त्या ठिकाणी एक मनोरुग्ण आढळून आल्याचे प्रशासनाने सांगितले.

रेल्वे कायद्याच्या कलम १५४ नुसार रेल्वेवर दगडफेक केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकाचे नाव ईश्वर आणि दुसऱ्याचे नाव रवींद्र असल्याची माहिती मिळत आहे. त्यापैकी ईश्वर हा मनोरुग्ण असून त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर प्रकरणाची पोलीस विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.