ठाकरे गटाच्या दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश!

    10-Feb-2024
Total Views |

Shinde


मुंबई :
ठाकरे गटाच्या मुंबईतील दोन माजी नगरसेवकांनी शनिवार, १० फेब्रुवारी रोजी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
 
मुंबई महानरपालिकेच्या घाटकोपर येथील विभाग क्रमांक १२५ च्या माजी नगरसेविका रुपाली सुरेश आवळे आणि त्यांचे पती माजी नगरसेवक सुरेश आवळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच त्यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत दाखल होण्याचा निर्णय घेतला. या पक्ष प्रवेशाला आमदार प्रकाश सुर्वे उपस्थित होते.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.