वक्फ बोर्डाच्या जागेवर दुकान, मॉल बांधत मुस्लिमांना काँग्रेस देणार नफा
पाप काँग्रेसचे आणि शिक्षा हिंदूंना
09-Nov-2024
Total Views | 72
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात लँड जिहादच्या अनेक घटना घडत आहेत. पुन्हा एकदा राज्यात विधानसभा निवडणुकीत जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर वक्फ बोर्डाला प्रधान्य दिले जाईल अशी चर्चा आहे. राज्यातच नाहीतर आता देशातही वक्फ बोर्डाने काही हिंदू धर्मस्थळांवर दावा केला आहे. काँग्रेसने मतांच्या गोळाबेरजेसाठी फूस लावल्याचे बोलले जात आहे. आता वक्फ बोर्डाच्या जागेवर दुकान, मॉल बांधत मिळाणारा नफा हा मुस्लिमांना देणार असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
तर राज्यात आणि देशातील काही सरकारी जागेवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. एवढेच नाहीतर मुंबईत स्थित असलेले देशातील प्रतिष्ठित उद्योगपती अनंत अंबानी यांच्या घरावरही वक्फ बोर्डाने दावा केला आहे. आहिल्यानगर येथील कानिफनाथ मंदिरावर एकूण ४० एकर क्षेत्रावर आता वक्फ बोर्डाने दावा केला आहे. यामुळे आता वक्फ बोर्डाचा मुद्दा देश आणि राज्यात जोरदार चर्चेचा विषय आहे.
राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यावर अनेक मकबरा बांधण्यात आल्या आहेत. गडकिल्ल्यावरही आता कटटरपंथींनी आणि वक्फ बोर्डाने दावा केला आहे. अशातच आता काँग्रेसने आगामी विधानसभेत मतांच्या गोळाबेरजेसाठी वक्फ बोर्डाप्रमाणे दावा करत त्या जमिनीवर दुकाने, मॉल बांधत हाती आलेला मलिदा वक्फ बोर्डाच्या उरावर बांधणार असल्याचे सांगितले आहे. याचा फायदा मुस्लिमांना होणार आहे. यामुळे आता भाजप सरकार आता सकल हिंदू समाजाला एक होण्याचे आवाहन करत आहे.