बांगलादेश सरकारला जगद्गुरू रामभद्राचार्यंचा इशारा

अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने समजवावे लागेल!

    29-Nov-2024
Total Views | 53

Swami Rambhadracharya Muhammad Yunus

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Rambhadracharya warned Bangladesh) 
बांगलादेशात इस्कॉनशी संबंधित चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केल्यामुळे जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणी जगद्गुरू श्री रामभद्राचार्य यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "बांगलादेशने असे करायला नको होते. भारत बांगलादेश सरकारला समजावत आहे, परंतु जर त्यांना समजत नसेल तर मग आम्हाला आमच्या पद्धतीने समजवावे लागेल!", असे ते म्हणाले.
मध्य प्रदेशच्या चित्रकूट येथे माध्यमांशी संवाद साधताना पुढे ते म्हणाले, "विश्वभरातील हिंदूंनी संघटित होण्याची वेळ आली आहे. हिंदू संघटित झाले तर आसुरी शक्ती आपोआप पराभूत होतील. केंद्रातील राजकीय नेते बांगलादेश सरकारला समजावत आहेतच. त्यातूनही ते नाही समजले तर मग आम्हाला आमच्या पद्धतीने समजावावे लागेल." मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये हिंदूंना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. सोबतच हिंदू मंदिरे, देवदेवतांनाही लक्ष्य केले जात आहे. हिंदू धर्मगुरू चिन्मय कृष्ण दास यांच्यावर बांगलादेश सरकारने देशद्रोहाचा आरोप लावला असून, या अटकेच्या निषेधार्थ हिंदू समाजातील लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा
विमान अपघातानंतर माध्यमांच्या वार्तांकनांमुळे अपघातग्रस्तांच्या कुटूंबियांना भावनिक ठेच पोहोचल्याचा आरोप!

विमान अपघातानंतर माध्यमांच्या वार्तांकनांमुळे अपघातग्रस्तांच्या कुटूंबियांना भावनिक ठेच पोहोचल्याचा आरोप!

विमान अपघातांनंतर माध्यमांमध्ये होणाऱ्या वार्तांकनाबद्दल नियंत्रण ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची मागणी करणारी एक जनहित याचिका शुक्रवार दि.१८ जुलै रोजी मद्रास उच्च न्यायालयात कोइम्बतूर येथील वकील एम. प्रवीण यांनी दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय, नागरी विमान वाहतूक महासंचालक (डीजीसीए) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121