‘शाखा संगम’मधून समितीच्या सेविकांनी दर्शविले समन्वयाचे उदाहरण
12-Nov-2024
Total Views | 24
मुंबई : ‘राष्ट्र सेविका समिती’च्या प्रमुख संचालिका माननीय शांताक्का यांच्या उपस्थितीत रविवार, दि. १० नोव्हेंबर रोजी दिल्ली प्रांतात ‘शाखा संगम’ ( Shakha Sangam ) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी, पूर्ण गणवेशात एक हजारहून अधिक मुली, युवती, मध्यमवयीन महिला, वृद्ध महिलांनी आपला सहभाग दर्शवत समन्वयाचे उदाहरण सादर केले. दिल्ली प्रांतातील एकूण ३० शाखा यात सहभागी झाल्या होत्या.
‘राष्ट्र सेविका समिती’ आपल्या शाखेच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. शाखा दररोज नवनवीन युवतींशी जोडत आहे. त्यांच्या क्षमता वाढवत आहे. त्यांना संघटित करत आहे आणि देशभक्तीची भावना जागृत करत आहे. ‘एव्हरीवन नॅचरली’च्या व्यवस्थापकीय संचालक रिवा सूद आणि शशी बुबना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रिवा सूद यांनी “सेविकांच्या शिस्तीचे कौतुक केले आणि तनमनाला धनाची साथ मिळाली, तर स्त्री सशक्त राहते,” असे सांगितले. ‘राष्ट्र सेविका समिती’ला २०२६ मध्ये ९० वर्षे पूर्ण होणार आहेत. याप्रसंगी दिल्ली प्रांताने २०२६ मध्ये प्रांतात ९०० प्रशिक्षित सेविका आणि ९० घोष वादक सेविकांचे ‘विराट पथसंचलन’ कार्यक्रम आयोजित करतील, असे लक्ष्य ठेवले आहे. प्रमुख संचालिका शांताक्का यांनी हे उद्दिष्ट राष्ट्र उभारणी आणि महिलांच्या उत्थानासाठी एक आवश्यक योजना असल्याचे वर्णन केले, जे येणार्या तरुणी आणि मुलींना प्रेरणा देईल आणि सामाजिक दृष्टिकोनातून महिलांच्या भूमिकेसाठी त्यांच्या चेतना विकसित करेल. गीतेच्या १६व्या अध्यायाचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. जेणेकरून महिला सुशीला, सुधीरा आणि समेधेच्या दिशेने अग्रेसर होतील.