मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची लग्न होणं आणि लग्न मोडणं या बातम्या सातत्याने समोर येत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, त्यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा असून अभिषेकने ऐश्वर्याला धोका दिल्याची सध्या सोशल मीडियावर बोललं जात आहे. अभिषेक दुसऱ्याच एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याने ऐश्वर्या आणि अभिषेकचं नातं तुटल्याचं देखील म्हटलं गेलं. या संबंधित अनेक पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. पण आता यावर अभिषेक बच्चन चांगलाच संतापला असून त्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून यात तो पापाराझींवर भडकताना दिसत आहे.
मिळालेल्या मीडिया रिपोर्टनुसार, ऐश्वर्या-अभिषेकच्या नात्यात दुरावा आल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय ते कोणत्याच कार्यक्रमांना एकत्रित दिसत नाहीत. मुकेश अंबानींच्या मुलाच्या म्हणजेच अनंतच्या लग्नातही अभिषेक बच्चन त्याच्या कुटुंबासोबत दिसला होता, तर ऐश्वर्या राय मुलगी आराध्यासोबत पोहोचली होती. यानंतर अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं. अभिषेक-ऐश्वर्या एकत्रही दिसत नाहीत, त्यामुळे या चर्चांनी जोर धरला आहे.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असताना अभिषेक बच्चनचा एक व्हिडिओ समोर आला आहे. विमानतळावरुन बाहेर पडताना अभिषेक बच्चन मीडियाच्या कॅमेऱ्यामध्ये दिसला. यावेळी पापाराझी त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढत होते. पुढे आल्यावर तो पापाराझींना म्हणाला की, "आता बस्स झालं." तर झालं असं की, अभिषेक नुकताच मुंबई विमानतळावुन बाहेर पडताना पापाराझींकडे दुर्लक्ष करत सरळ चालत गेला. पापाराझींसाठी पोज देण्यासाठी तो कुठेही थांबला नाही. काही पापाराझी अभिषेक बच्चनच्या मागे फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी पार्किंगमध्ये गेले. यानंतर अभिषेक बच्चन पॅप्ससमोर हात जोडून म्हणाला, "आता बस्स झालं भाऊ, धन्यवाद". यादरम्यान अभिषेक थोडासा रागावलेला दिसत होता.