‘नवरा माझा नवसाचा २’चा बॉक्स ऑफिसवर डंका; १० दिवसांत कोट्यावधींची कमाई
01-Oct-2024
Total Views |
मुंबई : सचिन पिळगांवकर दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा २ हा चित्रपट महाराष्ट्रभरात २० सप्टेंबरला प्रदर्शित झाला. २० वर्षांपूर्वी आलेल्या नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचाम चाहता वर्ग साहजिकच दुसऱ्या भागाकडे वळला आणि तो त्यांना आवडला देखील. प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी तुफान गर्दी करताना दिसत असून ‘नवरा माझा नवसाचा २’ बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे.
‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात १४.३६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तसंच शुक्रवार, शनिवार आणि रविवार ४.२१ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आतापर्यंत ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाने १८.५७ कोटींची कमाई केली आहे. यासंदर्भात सचिन पिळगांवकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, विजय पाटकर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे.