गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक (वाहतुक) यांच्याकडून नवी मुंबई येथे आढावा बैठक

डॉ.रविंद्र सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई-पुणे दृतगती महामार्गाचा आढावा

    05-Sep-2023
Total Views | 35
Ganeshotsav Director General of Police Meeting

मुंबई :
राज्यातील आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ अंतर्गत मुंबई-पुणे दृतगती महामार्गावरील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. गणेशोत्सव काळात वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी डेल्टा फोर्स व पेट्रोलिंग वाहनांची गस्त वाढविण्यात आली असून आवश्यक त्याठिकाणी सुचना फलक, रंबलर स्ट्रीप, गतीरोधक फलक, वाहतुक नियंत्रण सुचना फलक आदी लावण्यात आले असल्याचे नवीमुंबई येथील आढावा बैठकीत सांगण्यात आले.

दरम्यान, गणेशोत्सव काळात कोकणातील गणेश भक्तांना त्यांच्या गावी वेळेत पोहचता यावे व गणेशोत्सवा दरम्यान वाहतुक कोंडी न होता हा सण निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) डॉ.रविंद्र सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली नवीमुंबई येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गांवर झालेल्या विविध अपघातात मदत करणाऱ्यांचा अपर पोलीस महासंचालक(वाहतुक) डॉ.रविंद्र सिंगल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.






अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121