मुंबई : तामिळ अभिनेता आणि निर्माता विशाल याने मुंबई सेन्सॉर बोर्डावर एक खबळजनक आरोप केला आहे. मार्क अँटनी या चित्रपटाच्या हिंदी सेन्सॉर अधिकारांसाठी सेंट्रल ब्युरो ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने ६.५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी विशालने केली आहे.
अभिनेता विशालने एक व्हिडिओच्या माध्यमातून असे म्हटले आहे की, "रुपेरी पडद्यावर दाखवला जाणारा भ्रष्टाचार ठीक आहे. पण खऱ्या आयुष्यात हा भ्रष्टाचार पचवू शकत नाही. विशेषत: सरकारी कार्यालयांमध्ये. आणि त्याहूनही वाईट CBFC मुंबई कार्यालयात असं घडत आहे. चित्रपट मंजूर होण्यासाठी ६.५ लाख रुपये मोजावे लागले. माझ्या मार्क अँटनी चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी अशी घटना घडली असून चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी ३ लाख आणि प्रमाणपत्रासाठी ३.५ लाख अशी लाच मागण्यात आली.
माझ्या कारकिर्दीत कधीही अशा परिस्थितीचा सामना केला नाही. चित्रपट रिलीज झाल्यापासून संबंधित मध्यस्थला खूप जास्त स्टेक देण्याशिवाय पर्याय नव्हता. पुढे व्हिडीओ शेअर करताना विशाल म्हटले की, "महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि माझे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ही घटना निदर्शनास आणून देत आहे. त्यामुळे भविष्यात कोणत्याही निर्मात्याच्या आयुष्यात अशी घटना घडणार नाही. माझ्या कष्टाचे पैसे गेले भ्रष्टाचारासाठी? पण दुसरा मार्ग नव्हता. सर्व ऐकण्यासाठी खाली पुरावा. आशा आहे की नेहमीप्रमाणे सत्याचा विजय होईल”.