`फ्रेंड्स ऑफ बीजेपी'तर्फे ठाण्यात `सेल्फी विथ बाप्पा' स्पर्धा

    16-Sep-2023
Total Views |

ganpati


ठाणे : `फ्रेंड्स ऑफ बीजेपी'तर्फे ठाण्यात गणेशोत्सवात `सेल्फी विथ बाप्पा' स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात येईल, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व `फ्रेंड्स ऑफ बीजेपी'चे शहर संयोजक दत्ता घाडगे यांनी दिली. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून झालेली स्पर्धा ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहील.
 
गणेशोत्सवाच्या धामधुमीत गणपतीबरोबर सेल्फी काढण्याचा उपक्रम राबविण्यात येईल. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी ९०८२८९६७१९ या मोबाईल क्रमांकावर `सेल्फी विथ बाप्पा' असा मेसेज केल्यानंतर स्पर्धकांना क्यूआर कोड व स्पर्धेची लिंक पाठविली जाणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या निवडक स्पर्धकांना `फ्रेंड्स ऑफ बीजेपी'तर्फे ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात येईल. तसेच सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना सर्टिफिकेट देण्यात येणार आहे, अशी माहिती दत्ता घाडगे यांनी दिली.
 
या स्पर्धेची जबाबदारी आदित्य चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे गणेशोत्सवात नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यापुढील काळात सर्व स्तरातील नागरिकांच्या सोयीसाठी साठी आणखी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत, अशी माहिती दत्ता घाडगे यांनी दिली.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.