पावसामुळे यंदा साखर उत्पादनात घट.

ऑगस्ट महिन्यातील कमी पावसाच्या नोंदीने ऊसाच्या उत्पादनातही घट

    13-Sep-2023
Total Views |
Sugar
 
पावसामुळे यंदा साखर उत्पादनात घट.
 
 
ऑगस्ट महिन्यातील कमी पावसाच्या नोंदीने ऊसाच्या उत्पादनातही घट 
 
 
मुंबई:महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाल्याने मात्र साखरेच्या उत्पादनात घट झाल्याचे दिसून आले आहे.५९ टक्के घट पावसात झाल्याने यांचा फटका साखर उत्पादनाला बसला. महाराष्ट्रातील साखर उत्पादनात १४ % यंदा घट झाली आहे.गेल्या ४ वर्षात पहिल्यांदाच उत्पादनात घट यावेळी पाहायला मिळाली.यामुळे निर्यातीत याचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.
 
 
महाराष्ट्र क्रमांक १ चे साखर उत्पादक राज्य आहे.त्यामुळे कदाचित महागाई दरात साखरेची भर पडल्यास याचा देशस्तरावर परिणाम होऊ शकतो.पश्चिम महाराष्ट्रात भारतातील एकूण साखर उत्पादनापैकी २/३ उत्पादन होते.मागील वर्षी १०.५ मिलियन मॅट्रिक टन वरून घटून ऑक्टोबर १ पर्यंत ९ मिलियन मॅट्रिक टन पर्यंत उत्पादनाची नोंद होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.