जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज १४वा दिवस आहे. आंदोलनस्थळी संभाजी भिडे, संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर आले आहेत. “ही लढाई एक घाव दोन तुकड्यांची नाही. शिवप्रतिष्ठान तुमच्या पाठिशी आहे. जसं पाहिजे तसं, आरक्षण मिळालं पाहिजे. अजित पवार काळीज असलेला माणूस. शिंदे लबाड नाहीत. फडणवीस बेईमानी करणार नाहीत. उपोषणा थांबवा, लढा थांबवू नका.” असं संभाजी भिडे जरांगेंना यावेळी म्हणाले.
आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत, असे सांगतानाच संभाजी भिडे म्हणाले, "आरक्षणाचा प्रश्न राजकारण्याच्या हातात आहे. आता मागे वळून पहायचं नाही. आरक्षण मिळवूनच या लढ्याचा शेवट झाला पाहिजे. उपोषणा मागे घ्या, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत, आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. मी इथे दिखाव्यासाठी आलेलो नाही. तुम्ही मागे वळून पहायच नाही. मराठा समजाला पाहिजे तसं आरक्षण मिळालं पाहिजे. जे करताय ते १०१ टक्के योग्य आहे. राजकारण्यांच्या हाताता हा प्रश्न आहे. एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे, सध्या जे सत्तेवर आहेत, ते अजित पवार काळीज असलेला माणूस. शिंदे लबाड नाहीत. फडणवीस बेईमानी करणार नाहीत.” असं संभाजी भिडे जरांगेंना म्हणाले.
“आपण हे आंदोलन जीवाच्या आकांताने चालवताय. कौतुक करावं एवढ चांगल आंदोलन आहे. मी तुम्हाला उपदेश करायला आलेलो नाही. तुम्ही करताय ती, धर्माची समाजसेवा आहे, या तपश्चर्येचे फळ नक्की मिळणार. राजकारणी आहेत, म्हणून मनातून बिचकू नका. जो शब्द देतील, तो पाळून घ्यायच काम माझ्यावर सोडा. ही लढाई एक घाव दोन तुकडे अशी नाही. आग्रह आहे, जे सत्य आहे त्याबाजूने लढाई यशस्वी होणार. मोठ्या मुत्सद्दीपणे उपोषण थांबवूया. मी तुम्हाला नाउमेद करायला आलेलो नाही. मराठा समाज हा हिंदुस्थानचा पाठीचा कणा, आत्मा असलेला समाज आहे.” असं संभाजी भिडे म्हणाले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.