उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे पुत्र आहेत का? नितेश राणेंचा सवाल

    12-Sep-2023
Total Views |

Rane  
 
 
मुंबई: दिवसेंदिवस आमच्या मनात शंका निर्णाण होत आहे. उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे पुत्र आहेत का? की त्याला मुंबईतील कुठल्या कचऱ्याचून उचलून ठाकरे आडनाव दिलय. कारण त्यांचे गुण, विचार पाहता त्यांची डीएनए तपासणीची गरज असल्याचे भाजप आमदार नितेश राणेंनी म्हटले आहे. ठाकरेंची हिंदु धर्माबद्दलची भाषणं पाहता उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे पुत्र वाटत नाही, असंही नितेश राणे म्हणाले.
 
उद्धव ठाकरे काँग्रेसच्या प्रेमात पडले आहेत. त्यांना ऐकल्यानंतर अशी व्यक्ती कधीच ठाकरे यांच्या घरात जन्माला येऊ शकत नाही किंवा बाळासाहेबांचा हा मुलगा होऊ शकत नाही यावर शिक्कामोर्तब होत चाललय. असंही राणे म्हणाले. राम मंदिराच्या निर्माणासाठी हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकेर आयुष्यात अनेक संकटांना सामोर गेले. स्वत:च्या जीवाची पर्वा केली नाही. राम मंदिर अयोध्येत बनावं यासाठी कडवट भूमिका घेतली. त्या बाळासाहेबांचा मुलगा सांगतो की, तिथे जाणाऱ्या भक्तांच्या ट्रेनमध्ये आग लागेल, दंगली भडकतील. अशी वक्तव्ये केल्यानंतर उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे पुत्र कसे? असा प्रश्न पडतो.हे प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. ठाकरेंकडे दुसऱ्यांच्या शरीरावर बोलण्याची हिंमत असेल तर एकदा खुल्या व्यासपीठावर ये. असं आवाहनचं नितेश राणेंनी केलं आहे.
 
“उद्धव ठाकरे दुसऱ्याच्या शरीराबद्दल बोलतात. हातवारे करुन दुसऱ्याच्या शरीराच विश्लेषण करतात. स्वत:च्या शरीराचा थांगपता नाही. पुरुष आहे की, स्त्री हे तपासण्याची वेळ आलीय. अशा व्यक्तीने दुसऱ्याच्या शरीराबद्दल बोलाव? उद्धव ठाकरेंमध्ये हिम्मत असेल, तर त्यांनी खुल्या व्यासपीठावर यावं. तू तुझं विश्लेषण सुरु कर. आम्ही आमचं विश्लेषण करतो. नाही तुझं, थोबाड बंद करुन कायमच घरी बसवलं, तर मी माझा नाव बदलून टाकेन.” असं नितेश राणे म्हणाले.
 
“देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल उद्धव ठाकरे वारंवार बोलतात. पण 2014 ते 2019 मध्ये जेवढं रक्ताच्या भावाने याला संभाळल नाही. ज्यांना उद्धव ठाकरेंनी संपवण्याचा प्रयत्न केला, तेवढ प्रेम आणि विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दिला. पण यांनी नमकहरपणा केला.” असा आरोप नितेश राणे यांनी केला.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.