बारसू तेलशुध्दीकरण प्रकल्प : प्रकल्प प्रगतीपथावर नेण्यासाठी समिती स्थापन

    12-Sep-2023
Total Views |
Barsu Oil Refinery Project Committee Established

मुंबई :
राज्यातील बहुचर्चित असा 'बारसू तेलशुध्दीकरण प्रकल्प' लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्यात यासंदर्भात एकमत झाले आहे. यावेळी, एक दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या राजकुमार सलमान यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आले.

दरम्यान, सौदी अरेबियाची अरमाको कंपनी आणि भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने उभारला जाणाऱ्या या तब्बल ४ लाख कोटींच्य प्रकल्पाच्या कामकाजावर कामावर देखरेख ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. यामुळे सौदी अरेबिया आणि भारत या उभयतांमध्ये व्यापारसंबंध दृढ होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

त्याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्यात झालेल्या बैठकीत हायड्रोकार्बन, संरक्षण, सेमी कंडक्टर आणि अंतराळ क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याबाबतही चर्चा झाली असून येत्या काळात सौदी अरेबिया भारतात ८ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. एक दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या राजकुमार सलमान यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.