मुंबई : संजय राऊत यांची भाषा पाकिस्तानचे एजंट असल्यासारखी आहे. अशा लोकांवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे असे भाजप आ. नितेश राणेंनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात देखील नितेश राणेंना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले. यावेळी राणे म्हणाले की, आमचं सरकार सर्वांना न्याय देईल. G20मुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे वजन समजणार असल्याचे राणे म्हणाले. भात शेतीच्या नुकसानीबाबत आम्ही अहवाल मागितला आहे. राज्य सरकार म्हणून जी काही मदत करता येईल ती आम्ही करु असे नितेश राणे म्हणाले.
नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या जळगाव दौऱ्यावर देखील टीका केली. "प्रशासनाने आदेश देऊनही नाक रगडायला जळगावला गेले आहेत. स्वतःचे कार्यक्रम बंद झाल्यानं दुसऱ्याचं काय चाललंय यावर त्यांचे कार्यक्रम चालतात. राज्याचा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला प्रोटोकोल कळत नाही. मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना बघितले पण नाही आणि हल्ली शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. उद्धव ठाकरे हे पावसात भिजले होते की संजय राऊतांनी बिसलेरीनं पाणी ओतलं होतं." अशी टीका नितेश राणेंनी केली आहे.