तरूण सुशिक्षित असण्यासह रोजगारक्षम असणे महत्त्वाचे: डॉ. रघुनाथ माशेलकर

    11-Sep-2023
Total Views |
Dr Mashelkar
 
 
तरूण सुशिक्षित असण्यासह रोजगारक्षम असणे महत्त्वाचे: डॉ. रघुनाथ माशेलकर
 

मुंबई : तरूण आपल्‍या देशाचे भवितव्‍य आहेत त्यामुळे आज तरूण सुशिक्षित असणे पुरसे नाही, तर ते रोजगारक्षम असणे देखील महत्त्वाचे आहे. अधिक पुढे जात आपण आपल्‍या लोकशाहीचा लाभ घेत भारताला नव्‍या उंचीवर नेले पाहिजे, ज्‍यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राची भूमिका, त्‍यांचा पाठिंबा व सहयोग महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन पद्मविभूषण विजेते डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.ते मुंबईत आयोजित मेकिंग इंडिया एम्प्लॉयेबल कॉन्फरन्स अॅण्ड अवॉर्ड्स सोहळ्यात बोलत होते.
 
 
एडटेक कंपन्‍यांसोबत सहयोग करणाऱ्या युनिव्‍हर्सिटीज भावी कौशल्‍ये बिंबवण्‍यामध्‍ये अत्‍यंत महत्त्वाच्‍या असतील, ज्‍यामध्‍ये टीमलीज एडटेक आदर्श उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. उच्‍च शिक्षण, कौशल्‍य व रोजगारक्षमतेमधील उत्‍कृष्‍टतेला सन्मानित करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन इंडिया एज्युकेशन फोरम व इंडिया एम्प्लॉयर फोरमद्वारे करण्यात आले होते. नॉलेज पार्टनर म्हणून टीमलीज एडटेकचे सहकार्य लाभले.
 
 
मेकिंग इंडिया एम्‍प्‍लॉयेबल कॉन्‍फरन्‍स अॅण्‍ड अवॉर्ड्स (एमआयईसीए) शिक्षण, रोजगारक्षमता व कौशल्‍य या क्षेत्रांमधील वैयक्तिक उत्‍कृष्‍टता, नाविन्‍यता आणि वास्‍तविक विश्वातील प्रभावाला प्रशंसित करतात. हे पुरस्‍कार मेकिंग इंडिया एम्‍प्‍लॉयेबल या ध्‍येयाप्रती योगदान देणाऱ्या सर्वोत्कृष्‍ट व्‍यक्‍तींना प्रदान केले जातात.जामिया मिलिया इस्लामियाच्या कुलगुरू व पद्मश्री-प्राप्‍त श्रीमती नजमा अख्‍तर आणि झोहो कॉर्पोरेशनचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व पद्मश्री-प्राप्‍त श्री. श्रीधर वेम्‍बू यांना एमआयईसीए येथे जीवनगौरव पुरस्‍कारासह सन्‍मानित करण्‍यात आले.
 
 
टीमलीज एडटेकचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी शंतनू रूज म्‍हणाले, " एमआयईसीए २०२३ शिक्षण, रोजगारक्षमता व कर्मचारीवर्ग विकासामधील उत्‍कृष्‍टतेला प्रशंसित करण्‍यासाठी महत्त्वाचा क्षण आहे. या सोहळ्याने सर्वसमावेशक व रोजगारक्षम भारत निर्माण करण्‍याच्‍या कार्याला प्रशंसित केले आणि शिक्षण व रोजगारक्षमतेमधील तफावत दूर करण्‍याप्रती योगदान देणाऱ्या व्‍यक्‍ती व संस्‍थांच्‍या प्रयत्‍नांना सन्‍मानित केले. आम्‍ही उत्‍कृष्‍टतेप्रती योगदान देणाऱ्या सर्व विजेत्‍यांचे अभिनंदन करतो."
 
 
मेकिंग इंडिया एम्‍प्‍लॉयेबल कॉन्‍फरन्‍स अॅण्‍ड अवॉर्डसने नाविन्यपूर्ण उपाययोजना शोधण्यासाठी, सहयोग वाढवण्यासाठी आणि अधिक रोजगारक्षमतेच्या दिशेने भारताच्या प्रवासात महत्त्वपूर्ण बदल घडवणाऱ्या व्यक्ती व संस्थांना सन्‍मानित करण्‍यासाठी व्यासपीठ म्हणून काम केले.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.