मुंबई : 'कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय' (DOGR) पुणे येथे “यंग प्रोफेशनल-I” पदांच्या एकूण ०२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून रिक्त पदानुसार पात्र मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
दरम्यान, डीओजीआर अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकरिता मुलाखत दि. २७ सप्टेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आली आहे. तसेच, उमेदवारांसाठी मुलाखतीचा पत्ता, आयसीएआर- कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे महाराष्ट्र – ४१०५०५. उत्तीर्ण होऊन निवड झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.