लव्ह जिहाद एक भयाण वास्तव : द मंचर स्टोरी

    01-Jun-2023
Total Views |
Love Jihad Case in Manchar


ही गोष्ट आहे २०१९ या वर्षातली. मंचरला रहाणारी एक १६ वर्षाची हिंदू मुलगी बेपत्ता होते. दहावीचा पेपर आटोपून घरी येणार होती. मात्र, ती काही परतच नाही. घरच्यांची शोधाशोध सुरू होते. वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार मंचर पोलीस ठाण्यात देतात. आता थोडं मागे येऊयात.... जावेद शेख नावाचा एक तरुण हे सगळं घडवून आणत असतो. बेपत्ता मुलीच्या मैत्रीणीच्या संपर्कात जावेद आला. त्याने पीडितेच्या भोवती प्रेमाचं जाळं फेकलं. यासाठी दुसरं तिसरं कुणी नाही बेपत्ता मुलीच्या मैत्रिणीनेच पुढाकार घेतला होता. दरम्यान दोघांचे प्रेमसंबंधही जुळले होते. पण नेमकं हे घरी कळलं. तेव्हा जावेदला मुलीच्या घरच्यांनी समज देऊन सोडून दिलं. पण व्हायचं तेच झालं.
 
जावेदने सगळा कट तयार रचला. १० वीचा शेवटचा पेपर दिला की आपण पळून जाऊ, असं त्यानं मुलीला सांगितलं. ते म्हणतात ना सोळावं वरिस धोक्याचं. या वयात आपल्यासाठी कुणी काही करतंयं हे समजू लागलं आणि मुलीनं जावेदवर पूर्ण विश्वास टाकला. जावेदमुळेच एक दिवस आपला जीव धोक्यात येईल याची साधी कल्पनाही तिला नव्हती. जे नको होतं तेच झालं. जावेद आता त्या मुलीवर जोरजबरदस्ती करू लागला. त्यानंतर त्याने जरबदस्ती धर्मांतरण केलं आणि निकाह केला. सुरूवातीला मंचर मधून पळून आलेले हे दोघे शीर्डीत आले. तिथून दिल्लीला आणि मग बिहारला, अशी पळापळ सुरूच होती.

दरम्यानच्या काळात आईवडीलांनी ती बेपत्ता झाल्याची पोलीसात तक्रार दाखल केली. सुरूवातीला तत्परता दाखवत पोलीसांनी तपास सुरू केला.पण नंतर पोलीसही मुलीच्या कुटूंबाला टाळू लागले. दरम्यान पोलीसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला.पण पीडीत आणि तिला पळवून नेणार जावेद शेख अद्याप सापडले नव्हते. अनेक वर्षे उलटून गेली आणि मुलीच्या कुटुंबीयांनी सतत विनवणी करूनही, मुलीला शोधण्यात पोलिसांना अपयश आले.

कुंटूबाने ही इंभ्रतीखातर अपहरणाची माहिती कुणालाच दिली नाही पण मुलीचा शोध सुरूच ठेवला. या शोधात मुलीच्या भावाने त्याच्या मित्राच्या मदतीने जावेद हा त्यांच्या मंचर गावचा रहिवासी असल्याचे शोधून काढले. पण जावेदच्या घरच्यांनी पीडीतेच्या भावाला ती इथे नाही ,असं सांगत टाळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पीडीत मुलगी आणि जावेद दोघेही पुन्हा मंचरला आले. मात्र यावेळी तिला घडणाऱ्या घटनेची कुठलीच कल्पना नव्हती. त्याने तिला घरात कोंडून ठेवले. तिच्या शरीरावर सिगारेटचे चटके दिले. अनोळखी लोक त्यांच्या गैरहजेरीत तो घरी पाठवू लागला. तिला झोपेच्या गोळ्या दिल्या जाऊ लागल्या. तिला ‘बीफ’ खाण्यासाठी आणि नमाज पठणासाठी बळजबरी करण्यात आली.तिचा अनन्वित शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला
दरम्यान ‘द केरला स्टेारी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. मुलीचे आई वडील तो चित्रपट पाहायला गेले आणि आपल्या मुलीसोबतही असेच बरेवाईट झाले असेल, या भीतीने या पालकही हादरलेच. पुन्हा मुलीचा शोध सुरू केला. ते पुन्हा पोलीसांकडे गेले पण पोलीसांनी पुन्हा त्यांना टाळले.मात्र ह्यावेळी आईवडीलांनी आपल्या समाजातील काही सामाजिक कार्यकर्त्याशी संपर्क साधला. त्यानंतर मंचर परिसरातील काही लोकांच्या साहय्याने जावेदच्या घरी नुकतच एक मुलगी राहायला आल्यांची माहिती पीडीतेच्या कुटूंबाला कळली.

अखेर १६ मे रोजी कुंटूबाने आपल्या समाजातील काही लोकांसोबत जावेदच्या घरात घुसले. त्यावेळी एका खोलीत त्यांना त्यांची मुलगी हिजाब परिधान केलेली दिसली. पण ती खुप घाबरलेली होती. मुळात ती मुलगी तिच्या घरच्यांना घाबरत नव्हती, ती तिच्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीला घाबरत होती, कारण तीचामानसिक छळ करण्यात आला होता. त्यांनतर कुटुंबाने तिची सुटका केली पण घरी आल्यावर देखील ती कोणाशी बोलत नसे.शेवटी तिला मानसऔपचार तज्ञांकडे नेण्यात आले. त्यानंतर तिने आपल्याला अनेक महिने खोलीत कोंडून ठेवल्याचे, जबरदस्तीने धर्मातरण केल्याचे आणि तिला वेश्याव्यावसाय करण्यासाठी भाग पाडल्याचे कुटूंबियांना सांगितले. त्यानंतर पोलीसांनी जावेद शेखवर कलम ३७६ आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलायं. ही घटना भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनीही मांडलीयं.पण हे वास्तव लोकांसमोर येत असताना. लव्ह जिहाद नाकारणाऱ्यांनी याबद्दल एक शब्दही काढला नाही. नुकतेच अजित पवार यांनीही ‘लव्ह जिहाद’ नसतो, असं लांगूलचालन करणारं वक्तव्यं केलंयं. दुसरीकडे मला लव्ह माहिती आहे पण जिहाद नाही , असे विधान खासदार सुप्रिया सुळेंनी केले.

तसेच किरण कुलकर्णीची कथा सांगून , किरण बुरखा घालते.तिचा इस्लामचा गाढा अभ्यास आहे. ती पाचवेळचा नमाज पठण करते. ‘तिहेरी तलाक’विरोधी कायदा नको, माझा शोहर माझ्या मुलांचा बाप आहे. आमचे आम्ही पाहून घेऊ,’ असं बोलणाऱ्या किरणची कथा सागंणाऱ्या सुप्रियाताईंनी किरण सोबत झालेले अत्याचार सोयीस्कररित्या सांगायला का विसरल्या? त्यामुळे मला 'लव्ह' माहितीयं पण 'जिहाद' माहित नाही, असं म्हणणाऱ्या सुप्रियाताईंनी त्या पीडितेबद्दल घडलेला पुढचा जिहाद माहिती असून का सांगितला नाही?हा प्रश्न निर्माण होतो. बंर ते जाऊ द्या, दिल्लीत नुकताच घडलेल्या साक्षी हत्याकांडानंतर तरी जिहाद अशी वक्तव्य करणाऱ्यांना का दिसला नाही?

इसिस’सारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचे षड्यंत्र असलेल्या ‘लव्ह जिहाद’चे केवळ तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी अप्रत्यक्षरित्या समर्थन करणाऱ्यांनी समाजातील हे वास्तव स्वीकारायला का नकार दिला? हा प्रश्न उपस्थित रहातोयं. दै.मुंबई तरुण भारतने याच विषयावर माझं शहर लव जिहाद मुक्त शहर ही मोहीम उभी केली. याअंतर्गत योगिता साळवी यांनी लव्ह जिहादबद्दलचे वास्तव लोकांपुढे मांडले. आपल्या तरुणींशी संवाद साधला. या सभांना तुफान प्रतिसाद मिळतोयं. 



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.