राज्यातील मंदिरात वस्त्रसंहिता ; महाराष्ट्र मंदिर महासंघाचा निर्णय

    26-May-2023
Total Views |
Maharashtra Temple Federation

नागपूर
: तोकडे आणि पाश्चात्य वेशभूषा करुन मंदिरात प्रवेश करण्यावर अनेकदा वादंग निर्माण झाले आहे. त्यास समर्थन आणि विरोधही होत असतानाच राज्यातील मंदिरांसाठी वस्त्रसंहिता जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाने याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाने काही विशिष्ट कपड्यांना कडाडून विरोध केला आहे. ही सुरुवात राज्याची उपराजधानी नागपूर येथून सुरु झाली आहे.

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनिल घनवट यांनी सांगितलं की, महाराष्ट्र मंदिर परिषद संपन्न झाली, त्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये मंदिर सुव्यवस्थापन, स्वच्छता, पावित्र्य आणि वस्त्र संहिता म्हणजेच ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रातल्या अनेक विश्वस्तांनी या निर्णयाला समर्थन दिलेलं आहे.

आता नागपूरच्या श्री गोपाल कृष्ण मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे. त्यानुसार फाटलेली जीन्स, स्कर्ट आणि अंगप्रदर्शन करणारे कपडे घालून मंदिरात प्रवेश करता येणार नाही. नागपूरपाठोपाठ संपूर्ण राज्यामध्ये हा निर्णय घेण्यात येत आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाने वस्त्रसंहितेचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.