पवारांची खरी जागा तुरुंगात हवी, अरविंद केजरीवालांचं ते ट्विट चर्चेत!

    26-May-2023
Total Views |
AAP arvind kejriwal met sharad pawar

मुंबई
: आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपविरोधात विरोधकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. विरोधकांची एक मोट बांधण्याकरिता विरोधकांतील नेत्यांकडून भेटसत्र सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आपचे संस्थापक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्रात मविआतील नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. एकदिवसापूर्वी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर दि. २५ मे रोजी केजरीवालांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतली होती. शरद पवारांच्या भेटीनंतर विरोधकांची एकजूट लोकसभा निवडणुकीत पहायला मिळेल का हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.

AAP arvind kejriwal met sharad pawar

दरम्यान, आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी दि. २५ मे रोजी पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांचे २०१२ मधील एक ट्विट सध्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्या ट्विटमध्ये केजरीवालांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते. त्या ट्विटमध्ये केजरीवालांनी म्हटले होते की, शरद पवारांच्या स्विस बँक अकाउंटचा नंबर आपल्याकडे आहे आणि तो लवकरच सार्वजनिक केला जाईल. त्याचबरोबर ज्या व्यक्तीला जेलमध्ये असायला हवं होतं ती व्यक्ती इतका मोठा नेता कसं काय होऊ शकते.

त्यामुळे आता केजरीवालांची बदलेली भूमिका दिल्लीच्या नागरिकांना निश्चितच विचार करायला लावेल. दि. २५ मे रोजी केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणाले, दिल्लीच्या नागरिकांच्या न्यायासाठी आपण शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे १० वर्षांपूर्वी केलेल्या ट्विटचा विसर केजरीवालांना पडलेला दिसतोय.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.