अभिनेत्री वैभवी उपाध्याय कालवश

    24-May-2023
Total Views |

vaibhavi upadhyay 
 
मुबई : ३२ वर्षीय वैभवी उपाध्याय हिचे वाहन अपघातात निधन झाले आहे. साराभाई साराभाई २ यामध्ये जस्मिन नामक भूमिका वैभवी करीत होती. चंदिगढ मध्ये तिचे कुटुंबीय आहेत. तिचा मृतदेह हिमाचल प्रदेश येथून मुंबईत आणला जाणार आहे. वैभवी केवळ ३२ वर्षांची असल्याने तिच्या कुटुंबियांवर आणि मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
 
सूत्रांच्या म्हणण्यानुसार वैभवी यांचा वळणवर कार वळवताना वाहनावरचा कंट्रोल सुटला. त्यानंतर घसरून तिचे वाहन दरीत कोसळले. दरम्यान या अपघातात तिचा मृत्यू झाला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.