'मराठी यायलाच हवं, माझं तर तो आवडता विषय' - अदा शर्मा

    24-May-2023
Total Views |

ada sharma 
 
मुंबई : 'द केरला स्टोरी' चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवड्यात २०० कोटींपेक्षा जास्त गल्ला केवळ भारतातून त्याने जमवला आहे. इतर चित्रपटाप्रमाणे केवळ दिग्दर्शक आणि निर्माते या चित्रपटाविषयी बोलत नसून अभिनेत्री अदा शर्माही यात मागे नाही. चित्रपट, कथानक आणि सामाजिक समस्या सर्वच विषयांवर उत्फुर्तपणे आपली मते अदा मांडते आहे. नुकत्याच एकज मुलाखतीत ने मराठी भाषेबाबत वक्तव्य केलं आहे.
 
अदा शर्माच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक मराठी कविता आपल्याला पाहायला मिळतात. ती म्हणते, "मला मराठी भाषा खूप आवडते. मला मराठी कविता आवडतात आणि त्या मी अनेक वर्षांपासून म्हणत आले आहे. शाळेतही मराठी हा माझा आवडता विषय होता. मला आणि माझ्या पालकांना असं वाटतं की, जर तुम्ही महाराष्ट्रात जन्मला आहात, वाढला आहात तर तुम्हाला मराठी आलं पाहिजे. प्रत्येकालाच मातृभाषेबरोबरच देशभरातल्या शक्य तितक्या इतर भाषांची प्राथमिक माहिती असायला हवी.”
 
अदला उत्तम मराठी बोलता येतं. आपण ज्या भागात जन्मलो, वाढलो, त्या भागातील भाषा आपल्याला यायला हवी, असे म्हणत तिने तिला मराठीची आवड कशी लागली ते सनीतले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.