सेंगोल म्हणजे काय? का स्थापन करणार नव्या संसद भवनात?

    24-May-2023
Total Views |

rajdand 
 
मुंबई : भारतीय प्रथा परंपरा पाहता, राज्यसत्तेचे हस्तांतरण होताना राजदंडही नव्या राज्याकडे जातो. राजदंडाचे रूप म्हणजे सेंगोल. हे सेंगोल तामिळ नाडू राज्यातून मागवून नव्या सांसद भवनात ठेवण्याचे ठरवण्यात येत आहे. याबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
 
अमित शहा म्हणाले, "या मागे युगानुयुगे जोडलेली परंपरा आहे. सेंगोलने आपल्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली होती. हे सेंगोल सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक बनले. याबाबतची माहिती पीएम मोदींना मिळताच त्याची कसून चौकशी करण्यात आली. मग ते देशासमोर ठेवायचे ठरले. यासाठी, नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा दिवस निवडला आहे."
 
सम्माई या तामिळ शब्दाचा अर्थ निष्ठा असा होतो. राजदंड हा संस्थानिक आणि राज प्रतिनिधींच्या राजसत्तेचे प्रतीक आहे. या सेनगोळच्या इतिहासात १९४७ मध्ये १४ ऑगस्टच्या दिवशी तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी तामिळ नाडुकडे हा राजदंड सुपूर्द केला. जे न्यायय आणि निपक्षपाती सरकार चालवतात त्यांना राजदंड दिला जातो.