टेलिव्हिजन अभिनेता नितेश पांडेचे निधन

    24-May-2023
Total Views |

nitesh 
 
मुंबई : कार्डिअॅशक अरेस्टमुळे ५१व्या वर्षी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता नितेश पांडे यांचं निधन झालं आहे. नितेश पांडे यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. सेलिब्रिटींनी त्यांच्या निधनावर सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला आहे. ही घटना शुटिं दरम्यान घडली असता त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला.
 
नितेश पांडे हे नाशिक येथील इगतपुरीमध्ये शूटिंगसाठी गेले होते. तिथेच कार्डिअॅाक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं होतं? याची माहिती नाशिक पोलिसांनी दिली आहे. नितेश पांडे हे इगतपुरीमधील हॉटेल ड्यू ड्रॉप येथे थांबले होते. संध्याकाळच्या जेवणाचीही ऑर्डर दिली होती. हॉटेल स्टाफने त्यांच्या रुमची बेल वाजवली. पण बराच वेळ आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे मास्टर चावीच्या सहाय्याने नितेश पांडेंच्या हॉटेल रुमचा दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी नितेश पांडे बेशुद्ध अवस्थेत आढळले. रात्री २ वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
 
‘अनुपमा’ या मालिकेत ते शेवटचे दिसले होते. ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका लक्षवेधी ठरली होती. याशिवाय ‘दबंग २’, ‘खोसला का घोसला’ या चित्रपटांतही त्यांनी काम केलं आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.