केजरीवाल मुंबईत घेणार ठाकरे, पवारांची भेट!

    23-May-2023
Total Views | 48
 
Arvind Kejriwal
 
 
 
मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. अरविंद केजरीवाल 23 मे रोजी संध्याकाळी सात वाजेपर्यंत मुंबईत दाखल होणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यासमवेत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान, खासदार संजय सिंह आणि खासदार राघव चढ्ढा देखील मुंबईत दाखल होणार आहेत.
 
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची आज भेट घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल संध्याकाळी मुंबईत दाखल होतील. मुंबई भेटीत अरविंद केजरीवाल उद्या 24 मे रोजी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. तर 25 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. याआधी केंद्राच्या अध्यादेशासंदर्भात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची देखील केजरीवाल यांनी भेट घेतली होती.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121