राष्ट्रवादीत पुन्हा वाद फोन आला नाही म्हणून जयंत पाटील नाराज, अजितदादा म्हणाले, "मी फोन..."
23-May-2023
Total Views |
मुंबई : जयंत पाटीलांच्या ईडी चौकशीवरून कोणत्याच नेत्याच्या चौकशीवर मी प्रतिक्रिया देत नाही, असे विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी केले आहे. जयंत पाटील यांची दि. २२ मे रोजी ईडीकडून ९ तास चौकशी करण्यात आली.त्या चौकशीनंतर मविआतील वरिष्ठांनी आपली विचारपूस केली. मात्र अजित पवारांनी आपल्याला फोन केलेला नाही , असे म्हणत पाटीलांनी नाराजी व्यक्त केली.
23 May, 2023 | 12:4
दरम्यान जयंत पाटीलांनी एकट्याला ईडीने बोलवले नाही.तपास यंत्रणेला चौकशीचा अधिकार आहे, असे ही पवार म्हणाले. त्याचबरोबर भाजपमध्ये गेलेल्य़ाच्या चौकशी होत नाही. आम्हाला आता चांगली झोप येते असं भाजप नेते सांगतात, असे ही अजित पवार म्हणाले. त्यामुळे अजित पवारांनी जयंत पाटीलांची विचारपूस न केल्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीतील अतर्गंत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीची चर्चा अधिक रंगली आहे. तसेच जागा वाटपाबाबत बोलताना जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ घेतील.मात्र जागावाटपाबाबत मविआत वेगवेगळी मतं आहेत. तरी देखील मविआ मजबूत राहणार हवे तर स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असे ही पवार म्हणालेत.