साखरपुड्याच्या परिणीती चोप्राच्या डोळ्यात अश्रू, राघव चढ्ढा झाले भावुक

    22-May-2023
Total Views | 3
 Parineeti Chopra-Raghav Chadha Engagement Live: First Pics Out, Couple  Can't Stop Looking At Each Other | People News | Zee News 
 
मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्रा हिच्या लग्नाचा साखरपुडा संपन्न झाला आहे. ती लवकरचं विवाहबंधनात अडकणार आहे. परिणीती चोप्रा हिने १३ मे रोजी आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत साखपुडा केला. सध्या अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
 
फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट झळकत आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने, ‘आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात पाय ठेवत आहे म्हणून प्रचंड उत्साही आहे..’ असं कॅप्शनमध्ये म्हणाली. काही फोटोंमध्ये परिणीती भावुक झाली असून खासदार राघव चड्ढा होणाऱ्या पत्नाचे अश्रू पुसताना दिसत आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये म्हणाली, ‘आमची साखरपुड्याची पार्टी एखाद्या स्वप्नाप्रमाणे होती. आनंद, प्रेम, डान्स, भावना.. यांनी परिपूर्ण..’ शिवाय परिणीतीने राघव चढ्ढा यांना तिचा आधार, प्रेम आणि चांगला मित्र असं देखील सांगितलं आहे. परिणीती – राघव यांचं एकाच कॉलेजमध्ये शिक्षण झालं असलं तरी, दोघांच्या प्रेमाची सुरुवात मात्र नुकताच झाली आहे. दोघे पंजाब येथे भेटले आणि दोघांमधील प्रेम बहरलं. परिणीती तेव्हा पंजाब येथे सिनेमाचं शुटिंग करत होती. तेव्हाच दोघांची भेट झाली आणि भेटीचं रुपांतर प्रेमात झालं असं सांगण्यात येत आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121