आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

    22-May-2023
Total Views |
Aditya Thackrey

नागपूर
: शिवसेना (ठाकरे गट)चे नेते आदित्य ठाकरे हे दि. २२ मे रोजी नागपूर दौऱ्यावर आहेत. औष्णिक वीज प्रकल्प आणि कोळसा उद्योगामुळे होणाऱ्या प्रदुषणाबाबात हा दौरा आहे. त्यावेळीच या दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर नागपूरात झळकलेल्या बॅनरची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. आदित्य ठाकरे यांचे नागपूरात भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत.

त्यामुळे या पोस्टर्सनी मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसेच राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे. नागपूरच्या रामटेक आणि कन्हान येथील रस्त्यांवर आणि बस स्टॉपवर हे पोस्टर्स लागले आहेत. त्यावर भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब, आपले रामटेक विधानसभा मतदारसंघात हार्दिक स्वागत, असा मजकूर दिला आहे. ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख लोकेश बावनकर आणि उपजिल्हाप्रमुख समीर मेश्राम यांनी हे पोस्टर्स लावले आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.