विश्वगुरू भारत : कॅन्सरच्या भस्मासुराचा अंत

    21-May-2023
Total Views |
various Allopathy treatment for Cancer

आज आधुनिक भारत, स्वातंत्र्य प्राप्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सुवर्णकाळात विश्वगुरुपदाकडे वाटचाल करत असताना व ‘वसुधैव कुटुम्बकम’ या प्राचीन भारतीय संकल्पनेनुसार, वसुधा कुटुंब प्रमुख म्हणून काम करत असताना समस्त विश्वाच्या व कुटुंबाच्या स्वास्थ्याचे रक्षण करण्याची जबाबदारी किंवा दायित्व भारतावर नियतीने सोपवले आहे. कॅन्सरविरोधातील लढ्यातही भारत अशीच महत्त्वाची भूमिका निभावू शकतो, हे कित्येक संशोधनातून समोर आले आहे. त्याचाच या लेखात घेतलेला आढावा...

दिक विचारधारेनुसार धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ मानले जातात. या चार पुरुषार्थाचे मूळ आरोग्यात आहे. रोग त्याचा म्हणजे आरोग्याचा नाश करून जीविताच्या परमसुखाचा नाश करतात व रोग हा मानवाला धोका उत्पन्न झाला आहे. या रोगांच्या उपचार व रोगमुक्तीसाठी काय उपाय करावा या विचाराने अंगिरस, नारद, कश्यप असे अनेक महर्षी हिमालयात एके जागी एकत्र जमले. या परिषदेचा विषय होता ’मानवाचे रोग व त्यांचे निवारण’.. हे महर्षी तिथे ध्यानमग्न झाले व त्यांनी त्यांच्या ज्ञानचक्षूंना प्राप्त झालेल्या ज्ञानानुसार भरद्वाज ऋषींना इंद्राकडे आयुर्वेदशिकण्यासाठी पाठवले. पुढे हे ज्ञान गुरू शिष्य परंपरेनुसार इ.स.पूर्वी १००० वर्षांपर्यंत भारत वर्षात पसरले. पहिल्या चरकाने, अग्निवेश ऋषींची संहिता सुधारून संपादित करून ’चरक संहिता’ लिहून ते ज्ञान ग्रथित केले.

पुढच्या काळात पृथ्वीवरील मानव नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेले आहेत हे पाहिल्यावर, रोगी लोकांवर उपचार करीत गावोगाव, देशोदेशी फिरत राहिला म्हणून त्याला चर-चालणारा म्हणून ’चरक’ हे नाव प्राप्त झाले. नंतरच्या काळात अनेक अशा चरक वैद्यांनी हे आयुर्वेदाचे हे ज्ञान विकसित केले व त्यानुसार रोग्यांवर उपचार केले. पुढे शल्यक्रियांवर ’सुश्रुत संहिता’ व तिसरी महत्त्वाची संहिता म्हणजे ’काश्यपसंहिता’ म्हणजे आयुर्वेदाचा ’कौमार-तंत्र’ अथवा ’कुमार-भृत्य’ म्हणजे बालरोग विद्या अनेक ऋषींना शिकवली. हे आयुर्वेदाचे ज्ञान पुढे परदेशातही पसरले. आयुर्वेदानुसार उपचार करण्यासाठी ’वैद्यक व्यवसाय नीती’ची अग्नी, ब्राह्मण व इतर वैद्यांच्या साक्षीने विधिपूर्वक घेण्याच्या शपथ-प्रतिज्ञा या चरक संहितेत दिलेल्या आज्ञा, आजच्या काळातही प्रत्येक डॉक्टर व वैद्याने पाळणे हे विशेष जरूरीचे आहे. प्राचीन भारतातील वैद्यक शास्त्राच्या प्रगतीची, व्यवसायनीतीची व व्यवसायामागील भूमिकेची आजच्या काळातही रोगोपचार करण्यासाठीची उपयुक्तता जाणून घेणे आवश्यक आहे.

याउलट अलोपॅथीची पद्धत आहे. ’अलो’ म्हणजे दुसरा व ’पॅथॉस’ म्हणजे रोग. अ‍ॅलोपॅथीचा मूळ अर्थच आयुर्वेदाच्या विरुद्ध दृष्टिकोनाचे द्योतक आहे. अ‍ॅलोपॅथी म्हणजे रोगाच्या विरोधी असणारी, रोगाला विषयुक्त ठरण्याजोगी क्रिया करणारी घटकद्रव्ये, त्यांचा तोंडावाटे वा सुईवाटे शरीरात प्रवेश करणे. जी औषधे रोगाच्या उलट क्रिया करून रोगाचा प्रतिकार करतात त्या औषधांची योजना, म्हणजे अ‍ॅलोपॅथी. आज भारतात डॉक्टर वा मोठ्या रुग्णालयांच्याद्वारे मोठ्या प्रमाणात अ‍ॅलोपॅथीची उपाययोजना अनेक रोगांवर केली जाते. आज पाश्चात्य शास्त्रज्ञ, आयुर्वेद, योगविद्या, ध्यानविद्या अशा अनेक भारतीय शास्त्रांत स्वारस्य घेऊन त्यांत संशोधन करीत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्याकडे शास्त्रीय संशोधनाला लागणार्‍या उत्कृष्ट अशा यांत्रिक, तांत्रिक व आर्थिक सोईसुविधा आहेत. तसेच, प्रत्येक पाश्चात्य देशात लोकसंख्येच्या मानाने शास्त्रज्ञांचे मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. पण अशा (प्रायोजित?)संशोधनांना पुरस्कृत करणारे त्या देशांतील शासनकर्ते व प्रायोजक यांच्या हेतू शुद्धतेविषयी शंका घेण्यास जागा आहे.

कर्करोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जगात, विशेषतः अमेरिकेत, जगातल्या अनेक देशातील लोकांच्या जीवनशैली व आहारपद्धतीचे सर्वेक्षण करून, त्यातून निघालेल्या निष्कर्षांनुसार कर्करोग प्रतिबंध व उपचार यासंबंधी अनेक संस्थात संशोधन झाले आहे व आजही होत आहे. २५० च्यावर संशोधनांच्या निष्कर्षाचे पेपर प्रसिद्ध झाले आहेत या पेपर्सचा संदर्भ घेऊन हळदीच्या कर्करोगरोधक व प्रतिबंधक गुणांवर सारांशपर अभ्यास पेपर प्रसिद्ध झाले आहेत. या संशोधनाच्या निष्कर्षांवर केलेल्या संक्षिप्त सारांशाचा मराठी अनुवाद पुढे देत आहे. Dietary Turmeric Potentially Reduces the Risk of Cancer - Published in -sian Pacific Journal of Cancer Prevention, Vol. 12.2011 (-manda Hutchins-Wolfbrandt, -nahita M² Mistry, Published online on 15th September 2020.)

सर्वसाधारणपणे पाश्चिमात्य देशांपेक्षा भारतात कर्करोग वाढीचे प्रमाण पुष्कळच कमी आहे. अमेरिका, युकेत वास्तव्याला असलेल्या भारतीयांत सर्वसाधारण कर्करोग वाढीचे प्रमाण अगदी कमी आहे, तर अमेरिकेतल्या गोर्‍या लोकात हे प्रमाण फारच जास्त (कळसहशीीं) आहे. भारतात घसा, आतडे, स्वादुपिंड, फुफ्फुस, स्तन, गर्भाशय, बीजाशय (ओवरी), प्रोस्टेट, मूत्राशय, मूत्रपिंड, गुदद्वार, मेंदू, रक्त पेशी (ल्युकेमिया) यांच्या वाढीचे प्रमाण कमी आहे. सर्वसाधारणपणे अमेरिकेतल्या गोर्‍या पुरुषांत कर्करोग वाढीचे प्रमाण भारत व सिंगापूरच्या पुरुषांपेक्षा तीनपट अधिक आहे, आणि ५० ते ७५ टक्के जास्त अमेरिका व युकेमध्ये अनेक वर्षे वास्तव्यास असलेल्या भारतीयांत आहे. प्रोस्टेट कर्करोगांच्या वाढीचे प्रमाण अमेरिकेतल्या गोर्‍या पुरुषांत भारतातील पुरुषांपेक्षा २० पटीने जास्त आहे. सर्वसाधारणपणे भारतातील महिलांत कर्करोग वाढीचे प्रमाण नगण्य आहे, तर युएसमधील गोर्‍या महिलांत १८० टक्के जास्त आहे. सिंगापूरमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय स्त्री पुरुषात पोटाचा कर्करोगाचे काही रुग्ण आढळले आहेत.

भारतातील स्त्रीपुरुषातील कमीजास्त कर्करोग वाढीचे प्रमाण हे त्यांच्या जीवनपद्धतीत व आहार पद्धतीत सामावलेले आहे. तोंड, जीभ व स्वरयंत्र यांच्या कर्करोग वाढीचे प्रमाण तंबाखूचा खाण्यात व विडी ओढण्यात केलेल्या वापरामुळे आहे हे दिसून येते. थायरॉईड कर्करोग, आयोडीनचे रक्तातील प्रमाण कमी असल्याने होतो हे त्रिपुरातील मुलांच्या रक्त तपासणीत आढळून आले. दक्षिण भारतात जननेंद्रियांच्या कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणाचे कारण एक व्हायरस आहे हे निदर्शनास आले. भारतीयांची आहार पद्धती कर्करोगाच्या सर्वसाधारण वाढीच्या कमी प्रमाणाला कारणीभूत आहे हेही निदर्शनास आले आहे. शाकाहारी वनस्पतीजन्य आहार, कमीत कमी मांसाहार, जेवणात मसाल्यांचा (आले, मिरची पूड, चिंच, धने, कोथिंबीर, जिरे, कढीपत्ता, गरम मसाला इ.) व हळदीसारख्या कर्करोगप्रतिबंधक पदार्थांचा व लसूण, कांदा, हिंग, मेथी, राई(मोहरी-सरसो), जायफळ, खसखस, काळी मिरी, वेलची, दालचिनी यांचा वापर व पोट, आतडी, स्तन व घसा यांच्या कर्करोगाची शक्यता वाढवणार्‍या गोमांस (रेड मीट) आणि प्रक्रिया केलेले मांस यांचा कमीतकमी वापर ही कर्करोग वाढीचे प्रमाण रोखण्यास कारणीभूत आहेत, असे निष्कर्ष काढता येतात.
हळदीतील करक्युमिन हे घटक द्रव्य कर्करोग प्रतिबंधक असून हळदीत थोडी काळीमिरी किंवा पिंपळी पूड घातल्यास ती लवकर परिणाम करते हे आढळून आले आहे.

हे सर्वेक्षण अनेक वर्षांपूर्वी केलेले आहे. आज देशात कर्करोगचे प्रमाण वाढत चालले असून त्याची कारणे प्रदूषण, बदलती जीवनशैली व आहारपद्धती, वाढते ताणतणावही असू शकतील. International Journal of Molecular Sciences: -bstract: 20 March 2020 - - Review of Curcumin and Its Derivatives as anticancer Agents हे हळदीच्या कर्करोग प्रतिबंधक गुणांवर संशोधन करून प्रसिद्ध केलेल्या पेपर्सवर आधारित सारांशात्मक संक्षिप्त वर्णन आहे. कर्करोग हा जगात दुसर्‍या क्रमांकाचा मृत्यूचे प्रमाण असलेला रोग आहे आणि जगात सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेसाठी मोठा प्रश्न निर्माण करणारा आहे. कर्करोगावरील उपचारांवर बरीच प्रगती झाली असली तरी या रोगाने होणार्‍या मृत्यूंचे प्रमाणही अधिक आहे. म्हणून या रोगावर गुणकारी व सुरक्षित उपाययोजना करण्याच्या संशोधनावर प्राधान्याने भर देण्याची गरज आहे व त्या दृष्टीने सध्या संशोधनाची दिशा ठरवली जात आहे. गेल्या २० वर्षांत हळदीतल्या करक्युमिन या घटक द्रव्याच्या antioxidant, anti-inflammatory, antiAangiogenic या कर्करोग प्रतिबंधक गुणांवर संशोधकांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. कर्करोग हा जगातला दुसर्‍या क्रमांकाचा प्राणघातक रोग असून २०१८ सालच्या एका वर्षांत फक्त अमेरिकेत सुमारे ११ लाख लोकांना कर्करोगाची बाधा झाली व सहा लाख, नऊ हजार लोकांचा मृत्यू झाला. आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध असूनही नोंद केलेल्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूंची संख्या गेल्या ३० वर्षांत कमी झालेली नाही.

Frontiers in Pharmacology: Published online on 15 Sept. 2020 Turmeric and Its Major Compound Curcumin on Health: Bioactive Effects and Safety Profiles for Food, Pharmaceutical, biotechnological and Medicinal Applications. हा २०२० साली प्रसिद्ध झालेला हळद व तिचा मुख्य घटक करक्युमिन यांच्यावरील संशोधनाचा संदर्भ घेऊन लिहिलेला रिपोर्ट संक्षेपात म्हणतो: करक्युमिन (हळदीतला मुख्य घटक) हा अनेक शतके आयुर्वेदव चिनी औषधांचा घटक राहिलेला आहे. तसेच,खाद्यान्नाला रंग येण्यासाठी पाककलेत वापरला जात आहे. गेली काही दशके हळदीचे शरीराअंतर्गत परिणाम यावर सखोल अभ्यास होत आला आहे. या रिपोर्टमध्ये हळदीचा, तिच्या अँटिऑक्सिडेंट, ऍन्टीकन्सर, अँटी-इंफ्लमेंट्री, न्यूरोप्रोटेक्टिव्ह, हेपॅटॉप्रोटेक्टिव्ह आणि कार्डियोप्रोटेक्टिव्ह औषधी गुणांचा व त्यासंबंधीच्या व्याधीवर गुणकारी औषधे निर्माण करण्यासाठी लागणार्‍या माहितीचा प्रामुख्याने उहापोह केला आहे.

हळदीवरचे हे संशोधन हळदीमधले मुख्य घटक द्रव्य करक्युमिन हे वेगळे करून त्यावर झाले आहे. या अनुषंगाने एक गोष्ट आठवते. काही वर्षांपूर्वी लसूण या कंदावर तिचे औषधी गुण जाणण्यासाठी केलेल्या संशोधनाचा रिपोर्ट "British Medical Journal' या संशोधनावर वाहिलेल्या मासिकात प्रसिद्ध झाला होता. त्या संशोधनाच्या निष्कर्षात म्हटले होते की, लसूणात कोणतेही औषधी गुण नसून तिचा वापर फक्त अन्न पदार्थाला चव येण्यासाठीच करता येईल हा रिपोर्ट पाहिल्यावर ‘पद्मभूषण’ डॉ. हेगडे यांनी चौकशी केल्यावर त्यांना समजले की हे संशोधन लसणाचा अर्क काढून त्यावर झाले होते. त्यावर त्यांनी संशोधकाला कळवले की अर्क न काढता लसूण मूळ स्वरूपात घेऊन तिच्यावर संशोधन करणे योग्य होईल. त्यावर तसे संशोधन पुन्हा नव्याने करून लसूणीचे अनेक औषधी गुण प्रकाशात आले. डॉ. हेगडेंनी भाभा परमाणु अनुसंधानमधल्या संशोधकांना संशोधनासाठी मूळ नैसर्गिक सेंद्रिय पदार्थ वापरण्यास सांगितले असून त्यांच्या सूचनेनुसार व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज अनेक नैसर्गिक वनस्पतींवर संशोधन चालू आहे, अशी माहिती आहे. जिज्ञासूंनी या विषयांवरची युट्यूबवर उपलब्धअसणारी डॉ. बी.एम.हेगडे यांची व्याख्याने जरूर ऐकावी.

भारताने कुटुंब प्रमुख म्हणून विश्व परिवाराचे स्वास्थ्य जपण्यासाठी भारतात पुढील उपाययोजना करणे हिताचे ठरेल.

१. संशोधनाविषयी अनुकूल ठरणारी शिक्षण प्रणाली निर्माण करणे. संशोधन कार्याला प्रोत्साहित करणारे वातावरण निर्माण करणे.

२. संशोधकांना, शास्त्रीय संशोधनाला आवश्यक असणारी साधन सामुग्री पुरवणे व सरकारमार्फत अर्थ सहाय्य करणे.

३. आयुर्वेद, योगविद्या, ध्यानविद्या, मानसशास्त्र अशा भारतीय शास्त्रांवर व त्यांच्या आजच्या परिस्थतीत वापरावर संशोधन करून नवी स्वस्थ जीवनासाठी आधुनिक जीवनशैली (हेल्दी लाईफ स्टाईल) व आहार पद्धती निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.

त्याचबरोबर भारतावर गेल्या हजार वर्षांपासून होत असलेल्या विध्वसंक आक्रमणास कारणीभूत असलेल्या विश्वासघात, फंद फितुरी, भ्रष्ट आचरण या अनाचारी भस्मासुरांचाही, प्राचीन भारतीय ज्ञानसंपदेचा पुनरुद्धार करून, ‘डिजिटल’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जालीम उपाययोजनेद्वारे नायनाट करणे हे भारताचा विश्वगुरूपदाकडे होणारा प्रवास अधिक सुकर होण्यास सहाय्य्यभूत ठरेल.

सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणी पश्यन्तु, मा कश्चित दुःख मा भवेत खख
ज्ञानचंद्र वाघ 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.