ठाकरेंच्या फार्म हाऊसवर पैशाचे गोदाम ; नितेश राणेंचा आरोप!

    21-May-2023
Total Views |
Nitesh Rane on Uddhav Thackeray

मुंबई
: भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा आरोप केला आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या कर्जत येथील फार्म हाऊसमध्ये भूमिगत पैशाचे गोदाम बांधले आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००० रुपयांची नोट चलनातून बाद करण्याच्या घोषणेनंतर संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. देशाची व्यवस्था सरकारच्या गुलामाप्रमाणे काम करत असल्याचे ते म्हणाले होते. संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत नितेश राणे म्हणाले, भ्रष्टाचाराच्या पैशातून कमावलेल्या २००० च्या नोटांचे बंडल कर्जत फार्म हाऊसमध्येच ठेवले आहेत.त्यामुळे फार्म हाऊसच्या चौकशीची मागणी राणेंनी केली आहे.

नितेश म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या युवा सेनेच्या माध्यमातून बीएमसी निवडणुकीतील उमेदवारांना तिकीट देण्यासाठी दोन कोटींची तिकीट पत्रिका देण्यात आली आहेत. उद्धव ठाकरेंनी पैसे घेतल्याशिवाय एकही तिकीट दिले नाही, आता त्यांचा मुलगा आदित्य ठाकरेही तिथे काम करतो.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.