जयपूरमध्ये २ हजारांच्या एकूण ७,२९८ नोटा सापडल्या

    20-May-2023
Total Views |
jaipur
 
जयपूर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दि. १९ मे रोजी २ हजाराच्या नोटांच्या वितरणावर रोक लावली, आरबीआयने २ हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्याचा निर्णय कालच जाहीर केला. या निर्णयामुळे नागरिकांत एकच भीती निर्माण झाली आहे. त्यातच जयपूर पोलीसांनी कारवाई करत २ हजारांच्या तब्बल ७,२९८ नोटा जप्त केल्या आहेत. जयपूरमधील एका कार्यालयात पोलीसांनी कारवाई केली त्यात या नोटा आढळून आल्या आहेत. माहिती तंत्रज्ञान विभागातील कार्यालयाच्या कपाटात या नोटा आढळून आल्या आहेत. कपाटात ठेवलेले एकूण २.३१ कोटी रक्कम ही ब्लँक मनी म्हणून जप्त करण्यात आली आहे. या रकमेत दोन हजाराच्या ७,२९८ नोटा जप्त करण्यात आल्या. तर ५००च्या १७ हजार १०२ नोटा आणि १किलो सोन्याची विटही सापडली पोलीसांनी या कारवाईत जप्त केली आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.