बांद्रा-वर्सोवा ब्रिज विरारपर्यंत आणणार!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

    20-May-2023
Total Views |
 
Eknath shinde
 
 
पालघर : बांद्रा-वर्सोवा ब्रिज विरारपर्यंत आणला जाईल.कामगारांसाठी १५० बेडचे ईएसआय हॉस्पिटल अंतिम टप्प्यात आहे. विरारपासून कोस्टलहायवे ॲक्सेस कंट्रोल थेट पालघरपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. एमएमआरडीएद्वारे आवश्यक प्रकल्प दिले जातील. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे.
 
पुढे सामुदायिक विवाह सोहळ्यासंबंधी बोलताना शिंदे म्हणाले, "सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रत्येकाने सामुदायिक विवाह सोहळ्याला सहकार्य केले पाहिजे. कर्ज काढून लग्नसोहळे केल्याने पालकांच्या मागे चिंता लागतात. असा खर्च टाळता यावा यासाठी असे सामुदायिक विवाहसोहळे गरजेचे असून ही समाज व काळाची गरज आहे."
 
बोईसर येथील आदिवासी तसेच आर्थिक दुर्बल घटकातील वधू-वर सामुदायिक विवाह सोहळ्यास मुख्यमंत्री यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. सामुदायिक विवाहसोहळ्यातील विवाहासाठीच्या अनुदानात २५ हजारांपर्यंत वाढ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.