मोठी बातमी! भारतात BGMI परत येणार! खुद्द केंद्रीय मंत्र्यांनीच केली घोषणा

    19-May-2023
Total Views |
 
BGMI
 
 
नवी दिल्ली : क्राफ्टन या दक्षिण कोरियाच्या कंपनीने शुक्रवार, १९ मे रोजी एक मोठी घोषणा केली आहे. बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया (BGMI) व्हिडिओ गेमचे ऑपरेशन पुन्हा सुरू करण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांकडून मान्यता मिळाली आहे. अहवालानुसार असे सांगण्यात आले आहे की, व्हिडिओ गेम दक्षिण आशियाई बाजारात लवकरच डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिला जाईल.
 
 
 
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी स्पष्ट केले आहे की, व्हिडिओ गेम BGMI ला देशात परत येण्याची परवानगी देण्याचा अंतिम निर्णय घेतला जाईल. गेम कायदेशीर करण्याचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी भारत सरकार आगामी 3 महिन्यांत वापरकर्त्याच्या हानी, व्यसनाधीनता आणि इतर बारिक समस्यांवर लक्ष्य ठेवेल. राजीव चंद्रशेखर म्हणाले, सर्व्हर लोकेशन्स आणि डेटा सुरक्षा इत्यादी समस्यांचे पालन केल्यानंतर BGMI ची ही तीन महिन्यांची चाचणी मंजूरी आहे.
 
क्राफ्टन इंडियाचे सीईओ शॉन ह्युनिल सोहन म्हणाले, "आम्ही भारतीय अधिका-यांनी आम्हाला बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाचे ऑपरेशन पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिल्याबद्दल त्यांचे अत्यंत आभारी आहोत. आम्ही आमच्या भारतीय गेमिंग समुदायाचे त्यांच्या समर्थनाबद्दल आभार मानू इच्छितो. आम्ही हे जाहीर करताना आनंदी आहोत की बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया लवकरच डाउनलोडसाठी उपलब्ध होईल."
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121