ठाण्यातील उद्योजक स्थानिक जाचाला कंटाळले

पोलिसासमवेत टिसाच्या बैठकीत उमटले पडसाद

    17-Mar-2023
Total Views | 119
Small Scale Industries Association

ठाणे : ठाण्यातील उद्योजक स्थानिकांच्या जाचाला पुरते कंटाळले आहेत. या अनुषंगाने उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालय व ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (टिसा) वतीने वागळे इस्टेट टिसा हाऊसमध्ये नुकत्याच पार पडलेल्या बैठकीमध्ये याचे पडसाद उमटले. यावेळी, पोलिसांनी उद्योजकांना आश्वस्त करून ११२ नुंबर वर फोन केल्यास ३ मिनिटात मदत मिळेल. असे सांगितले.

या बैठकीला टिसाच्या अध्यक्षा सुजाता सोपारकर, टिसाचे कार्यकारी सदस्य,पोलीस कमिटी मेंबर ए वाय अकोलावाला, उपाध्यक्ष आशीष सिरसाट, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, पोलीस उपायुक अमरसिंग जाधव,सहा. पोलीस आयुक्त वेर्णेकर, वागळे इस्टेट,श्रीनगर पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ निरिक्षक, कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष देवेन सोनी, उपाध्यक्ष राजू बैलूर, मुरली अय्यर व दीपक विश्वनाथ उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचालन टिसाचे कार्यकारी सचिव एकनाथ सोनवणे यांनी तर,उपाध्यक्ष भावेश मारू यांनी आभार मानले.

या बैठकीत औद्योगिक क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था, ट्रॅफिक व पार्किंगची समस्या, माथाडी कामगारांच्या नावे काम मिळवण्यासाठी होणारा त्रास, जबरदस्तीने स्क्रॅपचे कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी स्थानिक लोकांकडून होणारा त्रास, औद्योगिक क्षेत्रात येथील संबंधित नसलेल्या बसेसच्या पार्किंगची समस्या, औद्योगिक क्षेत्रात आठवडे बाजार, डबल पार्किंग, बेवारस वाहने, देणगीसाठी येणारे लोक इत्यादी मुद्दे उद्योजकांकडून मांडण्यात आले. तर संस्थेचे मानद महासचिव सुनील कुलकर्णी ह्यांनी देखील पार्किंग समस्येवर उपयुक्त सूचना केली. त्यावर पोलिसांकडुन उद्योजकांना आश्वस्त करण्यात आले. उद्योजकांना सुलभतेने व्यवसाय करता यावा यासाठी पोलीस खाते सदैव मदत करेलच पण उद्योजकांनी आपल्या कंपनीच्या बाहेरील मेंन गेटजवळ उच्चप्रतीचे नाईट व्हिजन कॅमेरे लावावे असे आवाहन करून अडचणीच्या वेळी ११२ नंबर वर फोन केल्यास ३ मिनिटात मदत मिळेल असे स्पष्ट केले.

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121